Sunday, August 31, 2025 05:46:17 PM

हवेत विमानाच्या इंजिनला लागली आग! पायलटने वाचवला 294 प्रवाशांचा जीव

अटलांटाकडे जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या DL446 या विमानाच्या एका इंजिनला उड्डाणानंतर काही वेळातच आग लागली. पायलटला विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आले.

हवेत विमानाच्या इंजिनला लागली आग पायलटने वाचवला 294 प्रवाशांचा जीव
Delta Airlines Fire
Edited Image

लॉस एंजेलिस: सध्या संपूर्ण जगभरात विमान सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एक थरारक घटना घडली आहे. अटलांटाकडे जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या DL446 या विमानाच्या एका इंजिनला उड्डाणानंतर काही वेळातच आग लागली. या घटनेनंतर पायलटने प्रसंगावधान राखत तातडीने आपत्कालीन लँडिंग करून तब्बल 294 प्रवाशांचे प्राण वाचवले.

आपत्कालीन लँडिंगमुळे वाचले प्रवाशांचे प्राण - 

प्राप्त माहितीनुसार, ही घटना लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच घडली. पायलटला विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच, लॉस एंजेलिस विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित आहेत.

हेही वाचा इंडोनेशियात 280 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग, पहा व्हिडिओ

25 वर्षे जुने विमान, चौकशी सुरू - 

या विमानात एकूण 282 प्रवासी, 10 केबिन क्रू, आणि 2 पायलट होते. कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, अशी माहिती डेल्टा एअरलाइन्सने अधिकृतपणे दिली आहे. हे विमान बोईंग 767-400 प्रकारातील असून त्याला General Electric CF6 इंजिन लावलेले होते. हे विमान जवळपास 25 वर्षे जुने असून सध्या या घटनेची तपासणी अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासन (FAA) करत आहे.

हेही वाचा - इस्रायलचा सीरियावर हल्ला; जीव वाचवण्यासाठी टीव्ही अँकरने स्टुडिओतून काढला पळ

डेल्टा विमानाला आग, व्हिडिओ व्हायरल - 

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विमानाच्या एका बाजूला जळणाऱ्या आगीचे दृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत. नेटिझन्सनी बोईंग कंपनीवर नाराजी व्यक्त केली असून पुन्हा एकदा ड्रीमलायनर आणि जुन्या विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तथापी, FAA अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'घटनेची गंभीरतेने चौकशी सुरू आहे. प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च आहे.' 
 


सम्बन्धित सामग्री