भोपाळ: ऑपरेशन सिंदूरबाबात विरोधी पक्षातील अनेक नेत विविध वक्तव्य करत आहेत. काँग्रेस युद्धबंदीवरून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला करत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'ट्रम्प यांनी एक फोन केला आणि नरेंद्रजींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास याचा साक्षीदार आहे, भाजप-आरएसएसचे हेच कॅरॅक्टर आहे. ते नेहमीच झुकतात. अमेरिकेच्या धमकीला न जुमानता भारताने 1971 मध्ये पाकिस्तानला उत्तर दिलं. काँग्रेसचे सिंह आणि सिंहिनी महासत्तांशी लढतात, ते कधीही झुकत नाहीत.'
हेही वाचा - राहुल गांधींना वाराणसी कोर्टाकडून दिलासा! भगवान रामावर केलेल्या टिप्पणीविरुद्धची याचिका फेटाळली
दरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधताना म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन मोदींना फोन केला. ते म्हणाले मोदीजी तुम्ही काय करत आहात? नरेंद्रजींनी लगेच शरणागती पत्करली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी हो सर म्हणत ट्रम्पच्या सूचनांचे पालन केले. तथापि, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधींचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला तो काळ आठवत असेल, जेव्हा फोन येत नव्हता. इंदिरा गांधी म्हणाल्या की, मी जे करायचे आहे ते करेन. हाच फरक आहे. हाच त्यांचा स्वभाव आहे. हे सर्व लोक असे आहेत. स्वातंत्र्याच्या काळापासून त्यांना शरणागती पत्रे लिहिण्याची सवय आहे, अशी टिकाही राहुल गांधींनी केली आहे.
हेही वाचा - ''बाधित झालेल्या इतर सर्व भागांसाठी एक पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची मागणी...''; राहुल गांधींनी लिहिले मोदींना पत्र
काँग्रेस हार मानत नाही -
काँग्रेस कधीही हार मानत नाही. गांधीजी, नेहरूजी, सरदार पटेल. हे सर्व हार मानणारे नाहीत. हे सर्व महासत्तेविरुद्ध लढणारे लोक आहेत. आज देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. एका बाजूला काँग्रेस आणि संविधान आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजप-आरएसएस आहे. देशातील संवैधानिक संस्था भाजप आणि आरएसएसने ताब्यात घेतल्या आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.