मुंबई : राज्यात सकाळपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार परिवाराने मतदान केले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, माजी राज्यपाल रमेश बैस, कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.