मुंबई : आज अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विशाखापट्टणममध्ये देशाचे पंतप्रधान मोदींनी योगाभ्यास केला. पाच लाख लोकांसोबत मोदींनी योगाभ्यास केला. तर पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्तीयोगमध्ये सामील झाले होते, यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत योगाभ्यास केला.
कुरुक्षेत्रात 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल बा दत्तात्रेय आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी योगाभ्यास केला. केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय सावकारे यांनी योगा दिनानिमित्त आज योगा केला. भुसावळ येथे योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदृढ आरोग्यासाठी या तिन्ही मंत्र्यांनी योगा करण्याचा नागरिकांना संदेश दिला.
जागतिक योग दिनानिमित्त आज नागपुरच्या यशवंत स्टेडियमवर भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागपुरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके आणि पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. योगच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला असून नागपूरकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
हेही वाचा : अॅव्होकॅडो प्रत्येकासाठी फायदेशीर नाही, 'या' लोकांनी त्यापासून राहावे दूर
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयटीबीपीनेही योगाभ्यास केला. आयटीबीपीने 14 हजार 200 फूट उंचीवर असलेल्या धन सिंग थापा आणि चार्टसे येथील पँगोंग त्सो नदीच्या काठावर योगा केला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जागतिक योग दिनानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुहेजवळ योगाभ्यासाचे आयोजन केलं. शेकडो स्थानिकांनी या योगाभ्यासात भाग घेतला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या इतर नेतेही यावेळी उपस्थित होते. तसेच योगा तज्ज्ञांनी विविध योगाभ्यासांचे प्रात्यक्षिक दाखवले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंत्री दादा भुसे यांनी योग केला. मालेगावात एम.एस.जी. कॉलेजात ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री भुसे यांच्यासह उपस्थितांनी संगीत योगा केला.. जागतिक योग दिनाचे महत्व सांगत मंत्री भुसे यांनी उपस्थितांना शुभेछा दिल्या.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माणगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या सभागृहात योग दिवस साजरा करण्यात आला. मंत्री अदिती तटकरे यांनीही या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला
योगदिनानिमित्त मुंबईत मंत्री नितेश राणेंनीही योगासने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर योगदिनानिमित्त राणेंनी योगासने केलीत. योगादिनानिमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिक्षक, तरुणांनी विविध योग प्रात्यक्षिके केली. कोल्हापूर बहिरेवाडीतील शासकीय योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयात, योग शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ योग शिबिरात सहभागी झाले.