Thursday, August 21, 2025 03:39:17 AM

माजी आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी

झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल करण्यात आले  असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

माजी आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल करण्यात आले  असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, झिशान यांचे वडील, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा त्यांना जीविताला धोका असल्याचे संकेत मिळाल्याने चिंता वाढली आहे.

झिशान सिद्दीकी यांना मिळालेल्या धमकीचे ई-मेल माहितीनुसार डी कंपनीच्या नावाने पाठवले गेले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पोलिसांनी झिशान यांचा सविस्तर जबाब नोंदवला असून, धमकी कुठून आली आणि तिच्या मागे कोण आहेत, याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात बाबा सिद्दीकी यांची हत्या मुंबईतील खेरवाडी भागात त्यांच्या कार्यालयाजवळच करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी तीन हल्लेखोरांनी अत्यंत जवळून गोळीबार करत त्यांचा जीव घेतला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या मुलाला मिळालेली धमकी याबाबत काय खुलासा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री