Sunday, August 31, 2025 07:34:50 AM

तुम्ही गप्प बसा, बोलू नका, गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना झापले

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार तू -तू-मै - मै

तुम्ही गप्प बसा बोलू नका गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना झापले

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार तू -तू-मै - मै झाली. नद्यांमधील वाढत्या नायट्रेटच्या प्रमाणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाले.
आदित्य ठाकरेंनी “मंत्र्यांना खातं कळतं की नाही?” असा सवाल करत पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केला, त्यावर गुलाबराव पाटलांनीही ठामपणे प्रत्युत्तर देत त्यांना गप्प बसण्यास सांगितले.

वाद कशावरून पेटला? 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नद्यांमधील दूषित पाणी आणि पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला. त्यावर गुलाबराव पाटील उत्तर देत असताना विरोधी पक्षातील काही आमदारांनी आक्षेप घेतला. त्याच वेळी, समोरच्या बाकावर बसलेले आदित्य ठाकरे बोलू लागले. त्यावर पाटलांनी त्यांना रोखत थेट सांगितले, “तुम्ही गप्प बसा, बोलू नका!”

हेही वाचा : मुंडेंच्या राजीनाम्यावर धसांनी केले मोठे वक्तव्य; नेमकं काय म्हणाले धस?

गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंनी आवाज वाढत असल्याने विधानसभेचे अध्यक्षांनी हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.

यानंतर बोलण्याची संधी मिळताच आदित्य ठाकरे म्हणाले, “इथे अनेक मंत्री अभ्यास करून येतात, मुख्यमंत्री स्वतः प्रश्नांना उत्तरं देतात, मात्र काही मंत्र्यांच्या उत्तरांमध्ये सुसूत्रता नाही. त्यामुळे अध्यक्षांनी यावर स्वतंत्र बैठक बोलवावी.”

गुलाबराव पाटलांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
आदित्य ठाकरेंच्या टिकेनंतर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले, “तुमच्या बापाला कळत होतं म्हणून मला खातं दिलं गेलं होतं, पण तुम्हाला ते माहित नाही!” त्यांच्या या विधानावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. वाढत्या गोंधळामुळे पाटलांनी आपले वक्तव्य बदलण्याचा प्रयत्न करत “वडील” असा शब्द वापरला, मात्र विरोधकांनी यावरही नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला

अध्यक्षांचा हस्तक्षेप आणि राजकीय तापमान वाढले
विरोधकांचा वाढता आक्रमक पवित्रा पाहता विधानसभेचे अध्यक्षांनी दोन्ही गटांना समज देत कोणत्याही सदस्याने व्यक्तिगत टीका करू नये, असे स्पष्ट केले. तसेच वादग्रस्त विधान सभागृहाच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले.


सम्बन्धित सामग्री