Wednesday, August 20, 2025 09:27:47 PM

विधानसभेसाठी 'वंचित'च्या ११ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभेसाठी 'वंचित'च्या ११ उमेदवारांची यादी जाहीर झाली. ही 'वंचित'च्या उमेदवारांची पहिली यादी आहे.

विधानसभेसाठी वंचितच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : विधानसभेसाठी 'वंचित'च्या ११ उमेदवारांची यादी जाहीर झाली. ही 'वंचित'च्या उमेदवारांची पहिली यादी आहे. 'वंचित'ने एका तृतीयपंथी उमेदवाराला विधानसभेसाठी संधी दिली आहे. रावेर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या उच्चशिक्षित असून, सध्या त्या मराठी साहित्यात पीएचडी करत आहेत.शमिभा पाटील या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असणाऱ्या फैजपूरच्या रहिवासी आहेत. त्याच 'वंचित'च्या एकमेव तृतीयपंथी उमेदवार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विनय भांगे यांना उमेदवारी दिली आहे.

स्वतंत्रपणे लढणार - वंचित

वंचित बहुजन आघाडी यावेळी इंडी आघाडी  किंवा मविआसोबत नाही तर स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढणार आहे. या निर्णयांतर्गत वंचितने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ११ उमेदवारांचा समावेश आहे. 

उमेदवारांची यादी

  1. रावेर (जळगाव) - शमीभा पाटील
  2. सिंदखेड राजा (बुलडाणा) - सविता मुंडे
  3. वाशिम - मेघा किरण डोंगरे
  4. धामणगाव रेल्वे (अमरावती) - निलेश टी. विश्वकर्मा
  5. नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे
  6. साकोली (भंडारा) - डॉ. अविनाश नान्हे
  7. नांदेड दक्षिण - फारुख अहमद
  8. लोहा (नांदेड) - शिवा नरांगळे
  9. औरंगाबाद पूर्व - विकास रावसाहेब दांडगे
  10. शेवगाव (अहमदनगर) - किसन चव्हाण
  11. खानापूर (सांगली) - संग्राम माने

सम्बन्धित सामग्री