Wednesday, August 20, 2025 01:09:32 PM

आव्हाड आणि वंचित यांच्यातील वाद विकोपाला; वंचितच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून आव्हाडांना शिवीगाळ

पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. वंचितच्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली.

आव्हाड आणि वंचित यांच्यातील वाद विकोपाला वंचितच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून आव्हाडांना शिवीगाळ

ठाणे: पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. वंचितच्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली. तीन दिवसांनंतरही ही पोस्ट वंचितच्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन काढलेली नाही. 

वंचित बहुजन आघाडी पक्षाने अधिकृतरित्या आव्हाडांविरोधात केलेलं ट्वीट समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द आहेत. तुझ्या नालायकीवरून नक्की कळते की तू सुधारणार नाही. तुझ्यावर अडचण येते तेव्हा तू आमच्या कार्यकर्त्यांना 50 वेळ फोन करतो. बाळासाहेबांना सांगा मला वाचवा, असं आम्हाला सांगतो. आता तुला आंबेडकर नावाची ॲलर्जी झाली का ? असा सवालही वंचितकडून आव्हाडांना विचारण्यात आला होता. हा वाद सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय कुणी मिळवून दिला या मुद्द्यावरून सुरु झाला. आव्हाड श्रेय घेण्यासाठी पुढे आले अशी भूमिका वंचितने घेतली आणि आव्हाड यांच्यावर टीका केली. वंचितने आव्हाड यांच्यावर आगपाखड केली. त्यानंतर, आव्हाड पुरते नरमले आहेत.

वंचितने आव्हाडांविरुद्ध केलेली पोस्ट
अरे पिसाळलेल्या ...,  तुझ्या नालायकीवरून नक्की कळते की तू सुधारणार नाही! जेव्हा तुझ्यावर अडचण येते तेव्हा तू आमच्या कार्यकर्त्यांकडे 50 वेळ फोन करतो आणि बोबलत बसतो की, बाळासाहेबांना सांगा मला वाचवा म्हणून. अरे .... आता तुला आंबेडकर नावाची ॲलर्जी झाली का? ... नालायकपणा सोड आणि सुधर जरा अशा आशयाची पोस्ट वंचितकडून करण्यात आली होती. 

हेही वाचा: यवत कसं पेटलं?, यवतमधील परिस्थितीवर काय म्हणाले फडणवीस?

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेले योगदान महत्वाचे असून न्यायालयीन लढ्यातली त्यांची भूमिकाही अतुलनीय आहे. संविधानविरोधी विचारधारांना लोळवण्याच्या लढाईत आंबेडकर कुटुंब नेहमीच सर्वांना मार्गदर्शक राहिले असून या कुटुंबाबद्दल एक वेगळाच आदर आहे असे रोहित पवार यांनी म्हटले. पुढे बोलताना वंचितच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेबांबद्दल वापरली गेलेली भाषा मात्र समर्थनीय नाही आणि ॲड. प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर जी यांना देखील ती भाषा पटणार नाही. या भाषेचा आम्ही निषेध करतो. सुजात जी आपण अशाप्रकारे ट्विट करणाऱ्या व्यक्तीला समज द्याल अशी इच्छा रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टद्वारे बोलून दाखवली. 

रोहित पवारांच्या पोस्टनंतर सुजात आंबेडकरांनी हे ट्विट पक्षात अनेकांना आवडलेले नाही. पक्षांतर्गत याची दखल घेतली जाईलच. पण, या निमित्ताने एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की, आंबेडकरवादी चळवळीचे यश हायजॅक करणे आणि त्यावर सरंजामवाद्यांनी राजकीय भाकर भाजणे हे किती काळ सहन करावे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 


सम्बन्धित सामग्री