मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या पूर्वी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर करत ८३ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित केले होते. शुक्रवारी सहावी यादी जाहीर करत वंचितने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत 128 उमेदवार वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहेत.