छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात केशरी रेशन कार्डधारकांना धान्य ऐवजी रोख अनुदान देण्याची योजना पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मात्र 57 हजार कुटुंबांपैकी 25 हजार कुटुंबीय रोख अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. वारंवार सांगूनही इतर शेतकरी कुटुंबाकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे आता रोख अनुदानासाठी 31 डिसेंबर पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करावी अन्यथा त्यांना अपात्र समजून त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल.असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
काय आहे नियम?
जे लोक सहा महिने सलग धान्याचा लाभ घेण्यासाठी जात नाहीत त्यांच्यासाठी रेशन कार्डाच्या सुविधा रद्द होतात. या तुमच्या चुकी त्यांच्या लक्षात येते की, तुम्ही आता स्वस्त अन्न खाण्यास पात्र नाही. तसेच तुम्हाला याची आवश्यकता नाही. अशा वेळेस सहा महिने रेशन न घेतल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाते.
त्याचबरोबर राज्यभरातील बोगस रेशनकार्ड धारकांचा शिधा घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शिधाधारकांना ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. त्यानुसार, शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही.
दरम्यान वारंवार सांगूनही इतर शेतकरी कुटुंबाकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे आता रोख अनुदानासाठी 31 डिसेंबर पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करावी अन्यथा त्यांना अपात्र समजून त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल.असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.