Monday, September 01, 2025 10:50:18 PM

'फक्त आरक्षणाने मराठ्यांचं भलं होणार नाही'

भाजप सोडल्यानंतर आणि राशपमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम समरजित घाटगे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी मुलाखत घेतली. समरजित घाटगे यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे...

फक्त आरक्षणाने मराठ्यांचं भलं होणार नाही

३० सप्टेंबर, २०२४, मुंबई :  ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपा सोडून समरजित घाटगे यांनी राशपमध्ये जाणं पसंत केलं. यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं. समरजित घाटगे यांनी भाजपा का सोडला ? हा प्रश्न सर्वानाच पडला. भाजप सोडल्यानंतर आणि राशपमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम समरजित घाटगे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये भाजपात घाटगे कोणामुळे दुखावले? मविआला राज्यात भवितव्य काय ? कागलमध्ये कुठलं सावज टप्प्यात आलं आहे ? घाटगेंना मुसलमानांची मतं मिळतील ? या प्रश्नांवर चर्चा झाली.

समरजित घाटगे यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे -

'मुश्रीफांनी शरद पवारांना खूप छळलंय'
समरजीत घाटगे यांचा आरोप
'शरद पवारांमुळे मुश्रीफांनी पदं उपभोगली'
मुश्रीफ ईडीला घाबरून पळाले - घाटगे
फडणवीसांना सांगूनच राशपमध्ये - घाटगे
'कागलच्या परिवर्तनासाठी विधानसभेच्या रिंगणात'
'मुश्रीफांच्या भाषणात फक्त माझ्यावरच टीका'
'मुश्रीफ पुरोगामी विचारांचे नाहीत'
'मी एका विशिष्ट समाजाचा वैरी नाही'
'महायुतीविरोधात भूमिका मांडल्याने निधी अडवला'     
'मुश्रीफांनी निष्ठेचा सौदा केला'
'मुश्रीफांना आता शरद पवार जातीवादी वाटू लागले'


सम्बन्धित सामग्री