Monday, September 01, 2025 06:08:28 PM

Satish Wagh Murder Case: मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

सतीश वाघ यांची हत्या त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केली असल्याची माहिती समोर आली आहे.

satish wagh murder case मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : सध्या सतीश वाघ हत्या प्रकरण चर्चेत आहे. सतीश वाघ यांची हत्या त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. पोलिसांनी कोर्टात युक्तिवाद केला आहे. आम्हाला आरोपीची समोरासमोर चौकशी करायची आहे असे पोलिसांनी कोर्टात म्हटले आहे. यातली 3 शास्त्र आहेत. एक शस्त्र  सापडले. मोहिनी वाघने अक्षय जवळकरला 5 लाख रूपये दिले. आम्हाला या प्रकरणाचा तपास करायचा आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

 

हेही वाचा : कल्याणप्रकरणी नराधम विशालसह पत्नीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

 

 

नेमकं प्रकरण काय?

भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणातून हत्या झाली होती. या प्रकरणात 4 जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीने म्हणजेच मोहिनी वाघ यांनी पाच लाखांची सुपारी देऊन नवऱ्यांची हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी मोहिनी वाघ आणि तिचा प्रियकर अक्षय जवळकर याला अटक केली आहे. मोहिनी वाघचे त्यांच्याकडे फुरसुंगी येथे 16 वर्षांपासून राहणाऱ्या जवळकरशी अनैतिक संबंध होते. त्याला हाताशी घेऊन मोहिनीने पतीची हत्या केली. या प्रकणात पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. यावेळी पोलिसांनी उलटसुलट चौकशी केली. यादरम्यानच मोहिनीने पतीची हत्या केल्याचे कबूल केले. पती सतीश वाघ शिवीगाळ करत मारहाण करत होते. तसेच आर्थिक व्यवहार हातात नव्हते. ते हातात घ्यायचे असल्याने पतीची हत्या केल्याची कबूली मोहिनी वाघने दिली आहे.   

 


सम्बन्धित सामग्री