SBI Online Money Transfer Charges : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने किरकोळ ग्राहकांसाठी त्यांच्या तात्काळ पेमेंट सेवा (IMPS - आयएमपीएस) व्यवहार शुल्कात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. ही शुल्कवाढ 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल. हा बदल ऑनलाइन आणि शाखा दोन्ही व्यवहारांवर लागू होईल. सध्या लहान व्यवहारांना यातून सूट देण्यात आहे. मात्र, हे शुल्क मोठ्या व्यवहारांवर लागू होईल.
ऑनलाइन वापरकर्त्यांसाठी 25,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे आयएमपीएस व्यवहार आता आकारले जातील, तर या रकमेपर्यंतचे व्यवहार मोफत राहतील. ग्राहकांचे समाधान राखताना ऑपरेशनल खर्च संतुलित करण्याचा या निर्णयाचा उद्देश आहे.
आयएमपीएस व्यवहार (IMPS Transaction) म्हणजे काय?
आयएमपीएस ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ऑफर केलेली एक व्हर्च्युअल पेमेंट सेवा (virtual payment service) आहे. याच्या माध्यमातून वापरकर्त्यांना संपूर्ण भारतात त्वरित पैसे हस्तांतरित करता येतात. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे, SMS आणि IVR वगळता सर्व चॅनेलवर प्रति व्यवहार मर्यादा 5 लाख रुपये आहे. मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे त्वरित पैसे पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो. पूर्वी या सेवेअंतर्गत सर्व ऑनलाइन व्यवहार मोफत होते, परंतु नवीन शुल्क 25,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर लागू होईल.
हेही वाचा - Railway Scheme : रेल्वे तिकिटांवर 20 टक्के सूट, तुम्हीही गर्दीपासून वाचाल; अशी आहे रेल्वेची नवीन योजना
शुल्क किती असेल?
25,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1,00,000 रुपयांपर्यंतच्या रकमेवर 2 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. 1,00,001 ते 2,00,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी 6 रुपये अधिक जीएसटी आणि 2,00,001 ते 5,00,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी 10 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल.
एसबीआय आयएमपीएस शुल्क
25,000 रुपयांपर्यंत मोफत
25001 रुपये - 1,00,000 रुपये : 2 रुपये + जीएसटी
1,00,001 रुपये - 2,00,000 रुपये : 6 रुपये + जीएसटी
2,00,001 रुपये - 5,00,000 रुपये : 10 रुपये + जीएसटी
या शुल्कात कोणताही बदल नाही
शाखा व्यवहारांसाठी, एसबीआयने 2 रुपये + जीएसटी ते 20 रुपये + जीएसटी पर्यंतचे विद्यमान शुल्क कायम ठेवले आहे. याचा अर्थ असा की, एसबीआय शाखा चॅनेलद्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये कोणताही बदल होणार नाही. दुसरीकडे, संरक्षण वेतन पॅकेज (DSP), अर्धसैनिक वेतन पॅकेज (PMSP) आणि इतर विशेष वेतन पॅकेज असलेल्या काही खातेधारकांना ऑनलाइन आयएमपीएस हस्तांतरणासाठी पूर्ण सूट मिळत राहील.
हेही वाचा - Health Insurance : नोकरी बदलली तरी कंपनीत असलेला आरोग्य विमा संपणार नाही; फक्त हे करा