Sunday, August 31, 2025 05:10:50 PM

ठाकरेंच्या पीएवर गंभीर आरोप

शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पैसे घेण्याचा आरोप विनायक राऊत, उद्धव यांचे पी.ए रवी म्हात्रे आणि दत्ता दळवी यांच्यावर करण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पीएवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पैसे घेण्याचा आरोप विनायक राऊत, उद्धव यांचे पी.ए रवी म्हात्रे आणि दत्ता दळवी यांच्यावर करण्यात आला आहे. रवी म्हात्रे BKC रोडवर त्यांच्या महिंद्रा गाडीमध्ये या नियुक्त्यांच्या डीलसाठी बसतात. अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले पदाधिकारी सुद्धा या मंडळींनी नियुक्त केले आहेत असा आरोप केला जात आहे.

 कुर्ला विधानसभेतील किसन मदने हे नवनियुक्त विधानसभा संघटक आहेत, तर त्यांच्या मुलावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल आहे. या प्रकारांमुळे शिवसेनेची प्रतिमा चिघळली आहे. एकीकडे पक्ष प्रमुख बदलापूर प्रकरणात न्याय मागतो, तर दुसरीकडे अशा प्रतिमाबद्ध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करतो.

प्रविणा मोरजकर यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध आहे. मात्र, रवी म्हात्रे आणि विनायक राऊत यांच्या मर्जीमुळे, प्रविणा मोरजकर यांचे पती मनीष मोरजकर यांना पक्षात महत्वाचे पद दिले आहे. 


प्रविणा मोरजकर हिने  शिउबाठाच्याच कार्यकर्त्यांवर खोटे ऍट्रॉसिटी गुन्हे नोंदवलेले आहेत त्यामुळे शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांचा पती-पत्नीला प्रचंड विरोध केला जात आहे. तिचा नवरा मनीष मोरजकर स्वतः गुंड प्रवृत्तीचा असून कुर्ला नेहरू नगर मध्ये सामान्य जनतेची फसवणूक करून त्यांचे पैसे हडपले आहेत. हल्लीच नेहरू नगरच्या चौकातून पोलिसांनी मनीष  मोरजकर ला पोलिस स्टेशन मध्ये गाडीत टाकून नेलेले आहे. मनीष मोरजकरवर पोलिस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत.


सम्बन्धित सामग्री