Zomato Becomes Eternal: दीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रियेनंतर, झोमॅटोच्या भागधारकांनी सोमवारी मूळ कंपनी झोमॅटो लिमिटेडच्या नावात बदल करण्यास मान्यता दिली. यासह, कंपनीचे नाव आता इटरनल लिमिटेड असे बदलण्यात आले आहे. इकॉनॉमिक टाईम्समधील एका वृत्तानुसार, एटरनलमध्ये चार व्हर्टिकल्स असतील - फूड-डिलिव्हरी बिझनेस झोमॅटो, क्विक कॉमर्स युनिट ब्लिंकिट, गोइंग-आउट व्हर्टिकल डिस्ट्रिक्ट आणि बिझनेस-टू-बिझनेस (B2B) किराणा पुरवठा कंपनी हायपरप्युअर.
झोमॅटोची स्थापना 2008 मध्ये फूडीबे म्हणून झाली. नंतर त्याचे नाव बदलून झोमॅटो करण्यात आले. कंपनीने 2022 मध्ये क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिट विकत घेतली. कंपनीचे सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांनी शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, 'जेव्हा आम्ही ब्लिंकिट विकत घेतले, तेव्हा आम्ही कंपनी आणि ब्रँड/अॅपमध्ये फरक करण्यासाठी अंतर्गतरित्या 'इटरनल' (झोमॅटोची जागा घेत) वापरण्यास सुरुवात केली. आम्हाला असेही वाटले होते की ज्या दिवशी झोमॅटो व्यतिरिक्त काहीतरी आमच्या भविष्याचा प्रमुख चालक बनेल, त्या दिवशी आम्ही कंपनीचे नाव सार्वजनिकरित्या बदलून इटरनल असे करू. आज, ब्लिंकिटसह, मला वाटते की आपण तिथे पोहोचलो आहोत.'
हेही वाचा - झोमॅटो बॅगमधून दारू विक्रीचा नावा फंडा
अॅपचे नाव 'झोमॅटो'चं राहणार -
याआधी, काही दिवसांपूर्वीच, ऑनलाइन ऑर्डर घेऊन अन्न आणि किराणा सामान पोहोचवणारी कंपनी झोमॅटोला कंपनीच्या संचालक मंडळाकडून त्यांचे नाव बदलून इटरनल करण्याची मान्यता मिळाली होती. परंतु, असं असलं तरी कंपनीच्या अन्न वितरण व्यवसायाचे ब्रँड नाव आणि अॅपचे नाव 'झोमॅटो' राहील. शेअरहोल्डरच्या मंजुरीनंतर कॉर्पोरेट वेबसाइटचा पत्ता 'zomato.com' वरून 'eternal.com' असा बदलेल.
हेही वाचा - Online Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 5 वर्षांच्या बंदीनंतर ''हे'' चिनी शॉपिंग अॅप्स भारतात वापरण्यास परवानगी
झोमॅटोने आपल्या वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स विकून सुमारे तीन महिन्यांपूर्वी 8500 कोटी रुपये उभारले होते. तेव्हा झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल म्हणाले होते की, भांडवल उभारणीची प्रस्तावित योजना कंपनीच्या खात्यांना बळकटी देण्याच्या उद्देशाने होती. कंपनीचा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) इश्यू गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी उघडला.