Sunday, August 31, 2025 05:47:36 PM

आरोग्यमंत्र्यांना पाठवल्या उलट्या थांबवण्याच्या गोळ्या

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी पाठवल्या उलट्या थांबण्याच्या गोळ्या...

आरोग्यमंत्र्यांना पाठवल्या उलट्या थांबवण्याच्या गोळ्या 

बारामती: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सावंत यांनी असे म्हटले होते की, "त्यांच्याबरोबर बसल्यावर आमच्या उलट्या होतात" असे बोलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी त्यांना तडजोडीच्या गोळ्या पाठवल्या आहेत.

"दादाचा वादा, इलाज हमखास" या टॅगलाइन अंतर्गत उलट्या आणि मळमळ थांबण्यासाठी मंत्री तानाजी सावंत यांना या गोळ्या पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष वाढला आहे आणि राजकीय वातावरण तापले आहे. शशिकांत तरंगे यांच्या या कृतीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


सम्बन्धित सामग्री