Shravan 2025: पंचांगानुसार,आज 4 ऑगस्ट 2025 म्हणजेच श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अत्यंत खास आहे. कारण या दिवशी ग्रहांचे अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. सोमवारी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि सायंकाळी इंद्र योग तयार होत आहे. तर, या आठवड्यात शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार होत आहे. यामुळे श्रावणातल्या या दुसऱ्या सोमवारसह संपूर्ण आठवडा अत्यंत शुभफलदायी आहे. जाणून घेऊ, याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल..
श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारी, भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची योग्य विधींनी पूजा करावी. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी वाढते. कारण धार्मिक शास्त्रांनुसार, श्रावण महिन्यात हे दोघेही ज्योतिर्लिंगांमध्ये निवास करतात. काही शुभ योगांच्या निर्मितीमुळे, या शुभ मुहूर्तांवर केलेली शिवाची पूजा विशेष फलदायी असेल. भगवान भोलेनाथ वर्षभर आपल्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतील.
मेष (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी, 4 ऑगस्ट हा दिवस नोकरी आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल आणेल. या दिवशी तुम्हाला नवीन प्रकल्प, पदोन्नती किंवा व्यवसायात नवीन संधी यासारख्या करिअरमध्ये नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास उत्तम असेल. कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्यांमध्ये गोडवा येईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढू शकेल. तुमची लोकप्रियता वाढेल. हा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल.
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आणि आठवडा आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून खूप चांगला असेल. तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडतील. नोकरीच्या शोधात असाल, तर ती मिळू शकते. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल किंवा कोणतेही जुने काम अडकले असेल तर, त्यातून सुटका होऊ शकते किंवा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. या दिवशी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि तुम्हाला पैसे कमविण्याचे नवीन मार्ग दिसू शकतात. शुभ कार्य किंवा नवीन वस्तूखरेदीवर खर्च होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल आणि घरात आनंदी वातावरण असेल. प्रेम किंवा वैवाहिक जीवनात समस्या असल्यास त्या दूर होऊन सुसंवाद निर्माण होईल. जोडीदारासोबत भविष्याची नवीन योजना बनवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुमच्या योजना सहज पूर्ण होऊ शकतील. हा दिवस तुमच्यासाठी स्थिरता आणि समृद्धी आणेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्या.
हेही वाचा - Shrawan Somvar : दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवाला अर्पण करा 'तिळाची शिवामूठ'; घरीही करा अशी पूजा
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन आशा आणि प्रगतीने भरलेला राहील. आठवड्याच्या सुरुवातीलाच अनेक चांगल्या संधी चालून येतील. हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर राहील. या आठवड्यात तुमची जुनी रखडलेली कामे, सौदे अंतिम होऊ शकतात. नवीन संधी आणि त्यामधून चांगले फायदे मिळू शकतात. ज्या लोकांचे काम परदेशांशी संबंधित आहे, त्यांना या आठवड्यात इच्छित यश किंवा नवीन व्यवहार देखील मिळू शकतात. या आठवड्याच्या मध्यात, तुम्हाला काही शुभ किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंद वाढेल आणि प्रेम जीवन वाढेल. या आठवड्यात, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात कुटुंबातील सर्व लोक तुमचे समर्थन करतील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, या आठवड्यातील काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. हा आठवडा तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या प्रेम जीवनात चांगली प्रगती आणेल.
सिंह (Leo)
सिंह राशीसाठी, 4 ऑगस्ट हा दिवस आणि हा आठवडा आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य वाढवण्याचा दिवस असेल. तुम्हाला नोकरीत पदोन्नती किंवा सन्मान मिळू शकेल. सरकारी कामाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकेल. नवी नोकरी मिळू शकते. तुमच्या कामाचे, हुशारीचे आणि प्रतिभेचे कौतुक केले जाईल. कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक जीवनात तुमचा प्रभाव वाढेल आणि लोकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. प्रेम किंवा विवाहातील जोडीदार, कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद होईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. जोडीदाराचीही प्रगती होईल. हा दिवस तुमची ऊर्जा आणि उत्साह आणखी वाढवेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयांकडे वेगाने वाटचाल करू शकाल.
तूळ (Libra)
हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे शुभ संकेत घेऊन येत आहे. तुमच्यासोबत मोठ्या आनंदाच्या घटना घडतील. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील. या आठवड्यात तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या राशीच्या नोकरदार महिलांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. परंतु, तुम्ही तुमच्या भूतकाळातील अनुभवांचा वापर करून या सर्वांवर मात कराल. प्रेम संबंधांबद्दल बोलायचे झाले तर, या आठवड्यात तुमचे नाते अधिक दृढ होईल. परस्पर विश्वास मजबूत होईल आणि जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. वैवाहिक जीवनात आणि प्रेम जीवनात सुसंवाद राहील. एकंदरीत, या आठवड्यात तुमचे नाते अधिक दृढ होईल.
हेही वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी अशी चूक करू नका; नाहीतर, बहीण-भावाच्या नात्यात पडू शकते दरी
धनु (Sagittarius)
या राशीच्या व्यक्तींसाठी, हा काळ शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ राहील. आठवडा कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी अनुकूल असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतात आणि तुमचे लक्ष चांगले राहील. मात्र, या राशीच्या व्यक्तींनी कष्ट करण्यात कमी पडू नये. यासह संयम आणि योजनाही असणे आवश्यक आहे. प्रवासाशी संबंधित बेत पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही छोट्या-मोठ्या सहलीचे नियोजन करत असाल तर ती घडू शकते. तुम्हाला आध्यात्मिक कार्यात रस असेल आणि तुम्ही भक्तीत मग्न होऊ शकता. तुम्हाला कुटुंब, मित्र-मैत्रिणी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. हा दिवस तुमच्यासाठी प्रगती आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. थोडे-फार आजारपण येऊ शकते.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी, हा दिवस आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक आनंदासाठी खूप चांगला असेल. प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते आणि जर तुम्ही नवीन प्रकल्प किंवा काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस शुभ राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा येईल आणि घरात आनंदी वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. हा दिवस तुमच्यासाठी मानसिक शांती आणि आर्थिक बळ देईल.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)