Wednesday, August 20, 2025 12:57:19 PM

क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पहा धक्कादायक व्हिडिओ

क्रिकेट खेळत असताना एका 21 वर्षीय बी. टेकच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव विनय कुमार असे आहे.

क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पहा धक्कादायक व्हिडिओ
Student Dies of Heart Attack
Twitter

Student Dies of Heart Attack While Playing Cricket: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी, क्रिकेट खेळत असताना एका 21 वर्षीय बी. टेकच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव विनय कुमार असे आहे. तो खम्मम जिल्ह्यातील रहिवासी होता. विनय कुमार मेडचल येथील सीएमआर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. 

प्राप्त माहितीनुसार, कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान विनय कुमार मैदानावर फिल्डिंग करत होता. त्यादरम्यान, तो अचानक बेशुद्ध पडला आणि जमिनीवर कोसळला. ही संपूर्ण घटना कॉलेज कॅम्पसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, कुमार पडण्यापूर्वी एका विद्यार्थ्याला हाक मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

हेही वाचा - आयकर विभागाचा पराक्रम! शेतकऱ्याला धाडली 30 कोटी रुपयांची नोटीस

दरम्यान, या घटनेनंतर विनयला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या मृत्यूचे संभाव्य कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

पहा व्हिडिओ - 

हेही वाचा - स्वत:च्या सासूबाईंसाठी रिक्षाच्या मागे लिहिला भन्नाट मेसेज; नेटिझन्सनी दिली दाद

तथापी, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्याच्या कुटुंबाला या दुःखद घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विनय कुमार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाविद्यालयीन परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच त्याच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री