Monday, September 01, 2025 09:19:04 AM

मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन

देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे.

मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन

२७ सप्टेंबर, २०२४, मुंबई : देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे. मंत्रालयातील सचिव गेटवरील बंदोबस्तात असलेले पोलिसांचे निलंबन होणार आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी सहभागी आहेत. या पोलिसांचे आजच ( शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ ) निलंबन होण्याची शक्यता आहे. या बाबत पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

कोण आहे 'ती' महिला ?

महिलेचं नाव - धनश्री सहस्त्रबुद्धे आहे. 
तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण आहे. 
मुंबईतल्या दादरमधील एका वसाहतीत या महिलेचे वास्तव्य आहे. 
वसाहतीतही महिलेची दादागिरी सुरु असते. 
वसाहतीतील रहिवाशांना चाकूचा धाक दाखवते, घराच्या दारावर झाडूने मारते. 
सलमान खानबरोबर हिला लग्न करायचं आहे. 
अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागते. 
यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने तमाशा केला होता.


सम्बन्धित सामग्री