Monday, September 01, 2025 04:09:39 AM

राज्यपाल नामनियुक्त आमदारांचा शपथविधी

राज्यपाल नामनियुक्त सात आमदारांचा शपथविधी विधान भवनात झाला. भाजपाच्या तीन, शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली.

राज्यपाल नामनियुक्त आमदारांचा शपथविधी

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा अवघ्या काही तासांत होणार आहे. याआधी राज्यपाल नामनियुक्त सात आमदारांचा शपथविधी विधान भवनात झाला. भाजपाच्या तीन, शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली. भाजपाकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड; शिवसेनेकडून हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी विधान परिषदेवर आमदार झाले आहेत. शपथ घेऊन ते आमदार झाले. 

  1. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ आता विधान परिषदेवर
  2. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील आता विधान परिषदेवर
  3. वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड आता भाजपाकडून विधान परिषदेवर
  4. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील आता विधान परिषदेवर
  5. शिवसेनेच्या माजी आमदार मनिषा कायंदे आता विधान परिषदेवर
  6. छगन भुजबळांचे पुत्र पंकज छगन भुजबळ हे भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते नांदगावमधून दोनदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. आता विधान परिषदेवर
  7. सांगली - मिरज - कुपवाडा महापालिकेचे माजी महापौर आणि अजित पवारांचे निकटवर्तीय इद्रिस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुसलमान प्रतिनिधी आहेत. आता विधान परिषदेवर
     

सम्बन्धित सामग्री