Wednesday, August 20, 2025 12:56:58 PM

Bangladesh Air Force Plane Crash: बांगलादेशात भीषण अपघात! शाळेच्या इमारतीवर कोसळले लष्कराचे विमान; एकाचा मृत्यू

आज दुपारी सुमारे 1:30 वाजता, बांगलादेश हवाई दलाचे एफ-7 प्रशिक्षण लढाऊ विमान राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन कॉलेज कॅम्पसच्या इमारतीवर कोसळले.

bangladesh air force plane crash बांगलादेशात भीषण अपघात शाळेच्या इमारतीवर कोसळले लष्कराचे विमान एकाचा मृत्यू
Bangladesh Air Force Plane Crash
Edited Image

ढाका: बांगलादेशातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज दुपारी सुमारे 1:30 वाजता, बांगलादेश हवाई दलाचे एफ-7 प्रशिक्षण लढाऊ विमान राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन कॉलेज कॅम्पसच्या इमारतीवर कोसळले. या विमान अपघातात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

विमान कोसळल्यानंतर लागली आग

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान शाळेच्या इमारतीवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताच्या वेळी शाळेत वर्ग सुरू होते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे.

बचाव कार्य सुरू

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, बांगलादेश लष्कराचे जवान, तसेच नागरी संरक्षण दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हजारो स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली असून जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा -हवेत विमानाच्या इंजिनला लागली आग! पायलटने वाचवला 294 प्रवाशांचा जीव

एफ-7 लढाऊ विमानाचा अपघात

बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क विभागाने आपल्या निवेदनात एफ-7 हे हवाई दलाचे प्रशिक्षण लढाऊ विमान असल्याचे स्पष्ट केले आहे. अद्याप या अपघातामागील कारण स्पष्ट झालेले नसले तरी तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - ''बेजबाबदार वृत्तांकनासाठी WSJ आणि Reuters ने माफी मागावी...''; पायलट फेडरेशनची मागणी

शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

अपघातस्थळी शाळेचे विद्यार्थी उपस्थित असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे. तथापी, शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून घटनास्थळाच्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची दुजोरा दिला असून त्यांनी तपासासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री