नवी मुंबई : स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. विविध वयोगटातील महिलांमध्ये हा आजार आढळून येत आहे. तरुण वयात स्तनांचा कर्करोग अग्रेसिव्ह असतो. हार्मोन्समधील बदल, उशिरा लग्न, उशिरा गर्भधारणा व अयोग्य स्तनपान ही कर्करोगाची काही प्रमुख कारणे आहेत. तरुणपणातील कर्करोगात उपचारानंतरही रोग पसरण्याची किंवा परतून येण्याची शक्यता असते. पन्नाशीनंतर हा आजार अधिक वाढतो. भारतात कर्करोगाने होणाऱ्या महिलांच्या मृत्यूची आकडेवारी भीतीदायक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास या आजारावर मात मिळविणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.