महाराष्ट्र: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार आहे. दिनांक 27 जानेवारीला दुपारी 12:30 वाजता स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार आहे. हा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल पद्धतीने ऑनलाइन होईल. महाराष्ट्राचे सर्व मंत्री त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये या योजनेची सुरूवात करणार आहेत.
स्वामित्व योजनेअंतर्गत आता प्रत्येक व्यक्तीकडे प्रॉपर्टी कार्ड असणार आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड नसल्याने विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होत नव्हते. या योजनेमुळे जमिनीच्या मालकी हक्काचे वाद, फसवणूक आणि वडिलोपार्जित घरांशी संबंधित अडचणी दूर होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी देशभर ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून हे डिजिटल कार्ड सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेत 30 जिल्ह्यांमधील 30,515 गावांचा समावेश होईल. गावपातळीवर बांधकाम परवानगी आणि अन्य आवश्यक कामे देखील डिजिटल पद्धतीने केली जातील. गृहकर्ज घेताना या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग होईल. आदिवासी आणि मागासवर्गीय भागातील नागरिकांनाही याचा फायदा होईल. नागपुरात या योजनेचा शुभारंभ होईल, आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील संबंधित जिल्ह्यातून या योजनेचा लाभ घेतील. हे डॉक्युमेंट आधुनिक युगात अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय आहे नियोजन?
1. 27 तारखेला दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार
2. सर्व जिल्हयात डिजिटल द्वारे ऑनलाईन हा कार्यक्रम होणारं आहे
3. महाराष्ट्राचे सर्व मंत्री त्या त्या जिल्हयात स्वामित्व योजनेची सुरूवात करतील
4. आता प्रतेक व्यक्तीकडे प्रॉपर्टी कार्ड असणार आहे..
5. अनेकवेळा प्रॉपर्टी कार्ड नसल्याने अनेक योजनाचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना घेता येत नाही
6. जमिनीतील, मालकी हक्काचे वाद, फसवणूक, वडिलोपार्जित शेकडो वर्षातील घर या करीता डिजिटल पद्धतीने सगळ्याकडे कार्ड असावा म्हणून मोदींनी ड्रोन द्वारे देशाचं सर्वेक्षण केले..
7. 30 जिल्हयात 30 हजार 515 गाव या योजनेत डिजिटल होणारं आहे
8. गावपातळीवर असणारी बांधकाम परवानगी, असे विवीध कामे होणारं आहे
9. गृहकर्ज घेतेवेळी कागदपत्र नसतील तर व्यवसाय करतांना या प्रॉपर्टी कार्डचा फायदा होणार
10.आदिवासी मागास भागात देखिल फायदा होणार..
11. नागपुरात या योजनेच शुभारंभ मी करेन, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखिल एका जिल्हयात राहतील
12. हे आधुनिक युगात अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट असणार
13. शहरी भागात ड्रोन सर्वेक्षण होत आहे ते झाल्यावर शहरातही हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार..