मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली. सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यांना आढाद मैदानावर एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर जरांगेंनी आंदोलनासाठी मुदतवाढ मागितली. यावर आंदोलनाला गालबोट लागेल असं काम कुणीही करु नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना म्हटले आहे.
'युती सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं'
आमच्या कार्यकाळातच मराठ्यांना न्याय मिळाला. युती सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळालं. शासनाची सहकार्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्य करणार आहे. जरांगेंनी आंदोलनासाठी पुन्हा परवानगी मागितली असून आंदोलनाला गालबोट लागेल असं काम कुणीही करु नये असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
Manoj Jarange New Update: मनोज जरांगेंच्या उपोषणाला मुदतवाढ, पोलिसांकडून...
'ओबीसी समाजाला सांभाळून मराठ्यांना न्याय द्यावा लागेल'
मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांच्या संख्येने शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचले. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यात मुदतवाढ व्हावी अशी मागणी जरांगेंनी केली. पोलिसांकडून त्यांना एक दिवसीय आंदोलनाची परवानगी मिळाली. यावर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यास विरोध नाही. चर्चेतून मार्ग निघेल. पोलिसांना आंदोलकांनी सहकार्य केलंय. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्य करणार आहे. जरांगेंच्या मागण्यांबाबत पोलीस विचार करतील. ओबीसी समाजाला सांभाळून मराठ्यांना न्याय द्यावा लागेल असे मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांवर समिती चर्चा करेल. सर्व समाजाने आम्हाला मतदान केलंय. आम्हाला सर्वांना सांभाळायचंय. सर्व समाजाला सांभाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी काही पक्ष सोयीची भूमिका घेत असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. सरकार आणि समितीकडून मागण्यांवर चर्चा सुरु आहे असे फडणवीसांनी सांगितले.