Thursday, August 21, 2025 04:49:56 AM

15 तारखेला नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी

नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी. आमदारांच्या सोयीसाठी 15 तारखेला होणार शपथविधी. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. 16 तारखेला हिवाळी अधिवेशन

15 तारखेला नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी

महाराष्ट्र:  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला न होता आता 15 तारखेला होणार आहे. नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. आमदारांच्या सोयीसाठी 15 तारखेला शपथविधी होणार असलीच समोर आला आहे. त्याचबरोबर 16 तारखेला हिवाळी अधिवेशन होणार आहे. 

याआधी काय होते नियोजन? 

उद्या दिनांक 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर दुपारी 12 च्या मुहूर्तावर शपथविधी होणार असल्याचं देखील समोर आलं होत. परंतु आता यात बदल झाला असून आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला न होता आता 15 तारखेला होणार आहे. 

दरम्यान महायुती सरकारमध्ये खातेवाटपावरून वाद सुरु असल्याचं देखील बोललं जातंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही गृह खात्यासाठी आग्रही असले तरी गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे शिंदे यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नगरविकास खात्यासाठी शिंदे आग्रही आहेत. गेली पाच वर्षे शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. मात्र, या खात्याच्या कारभारावरून मुंबईतील अनेक विकासकांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे आता नक्की कोणतं खात कोणाकडे जाणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 


सम्बन्धित सामग्री