Vastu Tips For Kitchen in Marathi : भारतीय वास्तूशास्त्रास स्वयंपाक घराला अत्यंत महत्त्व आहे. स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते. माता अन्नपूर्णा सर्व प्रकारांनी सर्व काही पुरवून घरातील सर्वांना समाधानी ठेवते. घरात सुख-शांती नांदण्यासाठी माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा असतो. यासाठी स्वयंपाकघरात अशा वस्तू ठेवू नयेत, ज्या तेथे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. महिलांचा किंवा घरात असणाऱ्यांचा जास्त वेळ स्वयंपाक घरात जातो. तर, जाणून घेऊ, किचनमध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते-
तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली भांडी - तुटलेली भांडी गरिबी आणि दुर्दैवाचे प्रतीक मानली जातात. अशा भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते, असे वास्तुशास्त्रात मानले गेले आहे. तसेच, अशा वस्तू नजरेसमोर राहिल्याने मनाची प्रसन्नता राहत नाही. तेव्हा, अशा वस्तू त्वरित घरातून काढून टाकाव्यात. वापरात नसलेली किंवा खराब झालेली भांडी ठेवू नयेत.
हेही वाचा - Vastu Tips : घरात अचानकपणे माकड येणं शुभ आहे की अशुभ?
औषधे - किचनमध्ये औषधे ठेवल्याने कुटुंबातील लोकांचे आरोग्य वारंवार बिघडते. स्वयंपाकघरातील उष्णता आणि अग्नीमुळे औषधांचा प्रभाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. औषधे नेहमी स्वतंत्र कपाटात किंवा घरात इतरत्र ठेवावीत, जिथे ती सुरक्षित राहतील.
पाणी आणि अग्नी एकत्र - वास्तुशास्त्रानुसार, अग्नी आणि पाणी (पाण्याची टाकी, सिंक) हे परस्परविरोधी घटक आहेत. हे दोन्ही घटक एकत्र ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी गॅस शेगडी आणि सिंक यांच्यामध्ये काही अंतर असावे. शक्य नसल्यास त्यांच्यामध्ये लाकडी वस्तू किंवा फुलदाणी ठेवावी.
आरसा - स्वयंपाकघरात आरसा ठेवल्यास अग्नीचे प्रतिबिंब आरशात दिसते, ज्यामुळे अग्नीचा प्रभाव वाढतो आणि ते हानिकारक ठरू शकते. यामुळे घरातील लोकांच्या जीवनात अडचणी वाढतात. स्वयंपाकघरात आरसा लावणे पूर्णपणे टाळावे, असे सांगितले जाते. तसेच किचनमध्ये डस्टबिन उघडी ठेवू नये, शिळे अन्न जास्त काळ ठेवू नये आणि काटेरी रोपे स्वयंपाकघरात लावू नयेत. या सर्व गोष्टी दैनंदिन कामांमध्ये अडचणी निर्माण करू शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
हेही वाचा - Gayatri Mantra : अशा प्रकारे गायत्री मंत्राचा जप करा; जीवनात खूप सकारात्मक बदल घडून येतील
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)