Right Colours For Swastik at Different Directions : स्वस्तिक फक्त धार्मिक प्रतीक नसून वास्तुशास्त्रातही त्याचे खूप महत्त्व आहे. स्वस्तिक हे आपल्या जीवनात शुभ आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. प्राचीन काळापासून घर, दुकान किंवा कार्यालयात स्वस्तिक लावण्याची/काढण्याची परंपरा आहे. स्वस्तिक हे आपल्या सभोवतालच्या उर्जेचे संतुलन राखते. कोणत्या रंगाचे स्वस्तिक काढावे, याविषयीही शास्त्र आहे.
योग्य रंगाचे स्वस्तिक योग्य दिशेला काढल्यानं प्रगती, समृद्धी आणि जीवनात चांगल्या संधी वाढतात, असे मानले जाते. परंतु, बहुतेक लोकांना स्वस्तिकची दिशी आणि रंगाविषयी नीट माहिती नसते. स्वस्तिक योग्य पद्धतीने काढल्यास जीवनात चांगले परिणाम मिळू लागतात. स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आणि परिणाम जाणून घेऊया.
स्वस्तिक म्हणजे काय?
स्वस्तिक सृष्टीच्या चार दिशांचे प्रतिनिधित्व करते. हे एक अतिशय शक्तिशाली आणि शुभ प्रतीक मानले जाते. याचा अर्थ "स्वतः घडणे" म्हणजे जे स्वतःहून घडणे. त्यामुळे घर किंवा कामाच्या ठिकाणी उर्जेचे संतुलन राखले जाते. स्वस्तिक काढल्यानं घरात, दुकानात, कार्यालयात सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
हेही वाचा - Pithori Amavasya 2025: घर आजार-संकटातून मुक्त! दर्श पिठोरी अमावस्येला अतृप्त पितर प्रसन्न होतील, पाहा विधी-उपाय
स्वस्तिक काढताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात
- स्वस्तिक नेहमी स्वच्छ ठिकाणी काढावे.
- स्वस्तिक उलटे काढले जाणार नाही याची काळजी घ्या.
- स्वस्तिक काढताना मनात चांगले विचार ठेवा
स्वस्तिक लावण्याचे किंवा काढण्याचे परिणाम
- घरात आनंद आणि समृद्धी येते आणि कौटुंबिक वाद कमी होतात.
- आर्थिक अडचणी दूर होतात, व्यवसायात प्रगती होते.
- नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढते.
- नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन मन:शांती मिळते.
हेही वाचा - Pitru Paksha 2025: पितृपक्षापूर्वी 'या' गोष्टी घरातून बाहेर काढा अन्यथा...
कोणत्या रंगाचे स्वस्तिक कोणत्या दिशेला असावे?
1. उत्तर दिशा: उत्तर दिशा ही संधींची दिशा मानली जाते. ही दिशा व्यापाराशीही संबंधित मानली जाते. या दिशेला निळ्या रंगाचे स्वस्तिक काढावे. यामुळे जीवनात नवीन संधी आणि प्रगतीचे मार्ग मिळतात.
2. पश्चिम दिशा: या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा स्वस्तिक काढावे. कारण, पश्चिम दिशा नातेसंबंध आणि सोशल गोष्टींशी संबंधित आहे. येथे स्वस्तिक असेल तर परस्पर चांगले संबंध निर्माण होतात आणि समाजात आदर मिळतो.
3. आग्नेय दिशा: ही दिशा संपत्ती आणि आर्थिक स्थिरतेशी संबंधित आहे. येथे लाल रंगाचा स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते. यामुळे पैसा चांगला मिळत राहतो, आर्थिक समस्या दूर होतात.
स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही रांगोळी, रंग, हळद-कुंकू, स्टिकर, फोटो आदींचा वापर करू शकता. दारात काढलेल्या रांगोळीमध्ये स्वस्तिक काढणे अत्यंत शुभ मानले जाते. यावर हळद-कुंकू जरूर वाहावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)