Monday, September 01, 2025 09:13:03 AM

‘हा भगव्याचा विजय...’; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर भावुक

न्यायालयाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'गेल्या 17 वर्षांत माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं, अटक झाली. नंतर अनेक वर्षे छळ सहन करावा लागला.

‘हा भगव्याचा विजय’ मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर भावुक
Sadhvi Pragya Thakur
Edited Image

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या माजी खासदार आणि मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे मोठे विधान समोर आले आहे. आज न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींना निर्दोष जाहीर केले. त्यानंतर साध्वी प्रज्ञा भावुक झाल्या.

17 वर्षांत आयुष्य उद्ध्वस्त झाले -  साध्वी प्रज्ञा

न्यायालयाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'गेल्या 17 वर्षांत माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं, अटक झाली, आणि नंतर अनेक वर्षे छळ सहन करावा लागला. मी संताचं जीवन जगत होते. पण मला आरोपी केलं गेलं. भगव्याची बदनामी झाली. न्यायालयाने आज दिलेला निकाल हा भगव्याचा विजय आहे. भगव्याचा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल.' 

हेही वाचा - ''दहशतवाद कधीच भगवा नव्हता...''; मालेगाव स्फोट प्रकरणातील निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मी जिवंत आहे कारण मी संन्यासी आहे - 

दरम्यान, प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितलं की, 'या काळात आमच्यासोबत कोणीच उभा राहिला नाही. मी जिवंत आहे कारण मी संन्यासी आहे. कट रचून भगव्याची बदनामी करण्यात आली आहे. आज भगव्याचा विजय झाला आहे. दोषी असलेल्यांना देव नक्कीच शिक्षा देईल.' मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरील निकालानंतर अनेक पक्षांकडूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. 

हेही वाचा - Malegaon Blast Final Verdict : ''या'' कारणांमुळे मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया - 

शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ ही कल्पना पसरवून एक विशिष्ट वर्गाची मते मिळवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण चुकीच्या मार्गाने पुढे नेण्यात आलं. 17 वर्ष अत्याचार झाले. आज न्यायालयाने स्पष्ट केलं की कोणताही ठोस पुरावा नव्हता. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करताना प्रश्न केला की, त्यावेळी कोणाचे सरकार होते? जर त्यांनी योग्य चौकशी केली असती तर 2006 आणि 2008 मधील खरे आरोपीही आता कारागृहात असते.  
 


सम्बन्धित सामग्री