Sunday, August 31, 2025 04:30:47 PM

Monkey Showered Money Video : माकडाच्या हातात नोटांची बंडलं..! लोकांवर पाडला पैशांचा पाऊस..

Monkey Viral Video : माकडाने पैशांची बॅग हिसकावल्यानंतर लोक अचंबित झाले. यानंतर माकडाने बॅग उघडून त्यातून पैसे फेकण्यास सुरुवात केली. या पैशांचा पाऊस सुरू झाल्यानंतर मात्र..

monkey showered money video  माकडाच्या हातात नोटांची बंडलं लोकांवर पाडला पैशांचा पाऊस

Monkey Showered Money Viral Video : यूपीतील औरैया येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. इथे एका माकडाने झाडावरून नोटांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. पैसे पडताना पाहून तिथे गर्दी जमली आणि लोकांनी नोटा जमा करून पळवण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही अनोखी घटना औरैयाच्या बिधुना तहसीलमधील आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक माकडांच्या हिमतीचं आश्चर्य व्यक्त करत आहेत.

अहवालानुसार, अनुज कुमार हे त्यांच्या दुचाकीच्या ट्रंकमध्ये 80,000 रुपये घेऊन जमिनीच्या नोंदणीसाठी तहसीलमध्ये आले होते. परंतु, एका उपद्व्यापी माकडाने त्याच्या दुचाकीमधून पैशांनी भरलेली बॅग चोरली आणि झाडावर चढून नोटांचा वर्षाव सुरू केला. परिसरात उपस्थित असलेल्या लोकांनी सुमारे 28 हजार रुपये लुटले. यात माकड हा तर पैशांचे महत्त्व न समजणारा प्राणी असल्याने त्याने पैसे फेकले. मात्र, माणसांनी पैसे स्वतःचे नसतानाही ते गोळा करून स्वतःलाच घेतले. त्यांनी ते पैसे ज्याचे-त्याला परत केले नाहीत.

हेही वाचा - Gorilla Hugs Man Video : गोरिल्लाने दिली जादू की झप्पी; लोक म्हणाले, माणसापेक्षाही चांगले शिष्टाचार आणि सभ्य

माकड पैसे फेकत असल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत लोकांनी खाली पडलेल्या नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम काय झाला? अनुजला 80,000 पैकी फक्त 52,000 रुपये परत मिळाले. उर्वरित 28,000 रुपये एकतर लोकांनी गोळा केले किंवा माकडाने फाडून टाकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे!
या सर्व प्रकारावरून माणसांचा चुकीचा स्वभाव आणि दृष्टिकोन स्पष्ट दिसत आहे. माकडाने इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे फेकल्यामुळे अनुज कुमार यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय, लोकांनीही स्वतःच्या अप्रामाणिकपणाचे आणि असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करत दुसऱ्याच्या नुकसानाही स्वतःचा गैरफायदाच कसा घेता येईल, तेच बघितले. यात माकडाच्या आगळीकीपेक्षाही लोकांची चुकीची मानसिकता दिसते.

मात्र, व्हिडिओ पाहिल्यानंतर या भागाच्या जवळचे लोक म्हणाले की, बिधुना तहसीलमध्ये माकडांची दहशत इतकी आहे की, लोक जेवूही खाऊ शकत नाहीत! वकील म्हणतात की, थोडेसेही दुर्लक्ष झाले किंवा चूक झाली तर माकडे सामान हिसकावून घेतात. काही लोक गमतीने म्हणाले की, माकडाचे मन मोठे आहे, त्याने गरिबांचे भले केले. त्याच वेळी, माकडांचा एवढा उपद्रव पाहून काही लोकांनी भीतीही व्यक्त केली.

हेही वाचा - Flesh-eating Screwworm Parasite: धक्कादायक! जिवंत माणसांना खातो 'हा' किडा; मेक्सिकोमध्ये आढळले 5 हजार रुग्ण


सम्बन्धित सामग्री