Wednesday, September 03, 2025 10:28:53 AM

Brain Health: रोजच्या डाएटमध्ये 'हे' ड्रायफ्रुट्स समाविष्ट करा आणि आपल्या मेंदूला बनवा सुपरफास्ट

काही खास ड्रायफ्रुटसचे सेवन केल्यास आपला मेंदू सक्रिय राहतो आणि स्मरणशक्तीही सुधारते.

brain health रोजच्या डाएटमध्ये हे ड्रायफ्रुट्स समाविष्ट करा आणि आपल्या मेंदूला बनवा सुपरफास्ट

Brain Health: आपल्या दैनंदिन आयुष्यात काम, अभ्यास किंवा निर्णय घेणे हे सर्व काही आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. पण आधुनिक जीवनशैलीमुळे बर्‍याच वेळा मेंदू थकतो आणि लक्ष केंद्रीत करणे कठीण होते. अशा परिस्थितीत काही खास ड्रायफ्रुटसचे सेवन केल्यास आपला मेंदू सक्रिय राहतो आणि स्मरणशक्तीही सुधारते.

अक्रोड:
अक्रोडला ‘मेंदूचे सुपरफूड’ म्हटले जाते. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक तत्व मेंदूच्या पेशींना पोषण देतात, स्मरणशक्ती सुधारतात आणि विचार करण्याची क्षमता वाढवतात. रोज अर्धी मूठ अक्रोड खाल्ल्याने मेंदूला ऊर्जा मिळते.

बदाम:
सकाळी पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते. यामधील व्हिटॅमिन ई आणि फॉस्फरस नर्वस सिस्टमसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे मुलांना परीक्षा किंवा महत्वाच्या कामाच्या आधी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

हेही वाचा: Citrus Fruits Health Benefits: रोगप्रतिकारकशक्तीपासून ते त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत लिंबूवर्गीय फळे खाण्याचे फायदे, जाणून घ्या..

पिस्ता:
पिस्ता केवळ स्वादिष्ट नाही, तर मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स विचार करण्याची क्षमता वाढवतात. रोज काही प्रमाणात पिस्ता खाल्ल्याने मानसिक कार्यक्षमता सुधारते आणि मेंदूची लर्निंग क्षमता वाढते.

काजू:
काजूमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा अमिनो ऍसिड असतं, जो मेंदूत सेरोटोनिनच्या पातळीला वाढवतो. त्यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो. याशिवाय, काजूमधील मॅग्नेशियम मेंदूला रिलॅक्स करण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत करते.

ड्रायफ्रूटस खाण्याची योग्य पद्धत:
हलके भिजवून खाल्ल्यास त्यातील पोषक तत्व अधिक प्रमाणात शोषले जातात. रोज एक मूठ मिक्स ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यास मेंदू दीर्घकाळ आरोग्यपूर्ण राहतो.

तर, जर तुम्हाला आपला मेंदू कंप्युटरप्रमाणे तेज करायचा असेल, लक्ष केंद्रित करायचे असेल आणि स्मरणशक्ती सुधारायची असेल, तर आजपासून अखरोट, बादाम, पिस्ता आणि काजू आपल्या डाएटमध्ये जरूर समाविष्ट करा.
 

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 


सम्बन्धित सामग्री