Wednesday, September 03, 2025 11:40:45 AM

Quetta Rally Blast in Pakistan: पाकिस्तानातील क्वेटा हादरले! राजकीय रॅलीत भीषण स्फोट; 14 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी

ज्येष्ठ बलुचिस्तान नेते सरदार अत्ताउल्लाह मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर काही क्षणांतच हा स्फोट झाला.

quetta rally blast in pakistan पाकिस्तानातील क्वेटा हादरले राजकीय रॅलीत भीषण स्फोट 14 जणांचा मृत्यू 35 जण जखमी

Quetta Rally Blast in Pakistan: पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात किमान 14 जण ठार झाले, तर 35 जण जखमी झाले. मंगळवारी संध्याकाळी शाहवानी स्टेडियमजवळ हा स्फोट झाला. ज्येष्ठ बलुचिस्तान नेते सरदार अत्ताउल्लाह मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर काही क्षणांतच हा स्फोट झाला.

आरोग्यमंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी मृतांचा आकडा जाहीर करताना सांगितले की जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या मते, प्राथमिक तपासात हा हल्ला बीएनपी प्रमुख अख्तर मेंगल यांच्या ताफ्यावर असल्याचे दिसून येते, मात्र मेंगल यांना इजा झाली नाही. बीएनपी प्रवक्ते साजिद तारीन यांनी पुष्टी केली की स्फोटात पक्षाचे 13 सदस्य ठार झाले. अख्तर मेंगल यांचे वाहन तेथून जाताच स्फोट झाला, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Donald trump औषधांवर 200 टक्के Tariff लादण्याच्या तयारीत; अमेरिकन लोकच अडचणीत येणार?

अख्तर मेंगल यांनी एक्लवरून आपल्या सुरक्षिततेची माहिती दिली आणि कार्यकर्त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, आमच्या कार्यकर्त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. अल्लाह त्यांना जन्नत देवो आणि कुटुंबीयांना धीर देवो. 

हेही वाचा - Khawaja Asif Comment On Floodwater: 'पुराचे पाणी बादलीत भरा, ते अल्लाहचे वरदान आहे'; पाकिस्तानचे संरक्षणमंत्र्याचे वादग्रस्त विधान

दरम्यान, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले की, 'हा हिंसाचार प्रदेशात भीती आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.' बुगती यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश दिले तसेच सखोल चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे. तथापी, स्फोटानंतर क्वेटामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री