मुंबई: मुंबईतील आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून पाणी देखील न घेता कडक उपोषण करणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले आहे. आझाद मैदानावर त्यांनी घोषणा केली आहे. उपोषण करत असल्याने शनिवारी रात्री जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर आज त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: Maratha Protest: मराठा आंदोलनावेळी दुर्देवी घटना; एका मराठा आंदोलकाचा मृत्यू
आजपर्यंत मी पाणी घेत होतो. पण सोमवारपासून पाणी देखील पिणं बंद करणार आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कोणी एकही दगड मारणार नाही. काही झालं तरी मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईन असा शब्द त्यांनी मराठा समाजाला दिला आहे.