Wednesday, August 20, 2025 09:14:16 PM

मगरीच्या पिल्लांच्या तस्करीत दोघांना अटक

मुंबई कस्टम्सने वन्यप्राण्यांबाबत एक महत्त्वपूर्ण प्रकरण उघड केले आहे.

मगरीच्या पिल्लांच्या तस्करीत दोघांना अटक

मुंबई : मुंबई कस्टम्सने वन्यप्राण्यांबाबत एक महत्त्वपूर्ण प्रकरण उघड केले आहे. कैमन क्रोकोडायलस क्रोकोडायलस जातीच्या पाच  मगरीच्या पिल्लाची तस्करी करण्याचा दोन जणांचा प्रयत्न होता. या प्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. या मगरी एका आयताकृती बॉक्समध्ये लपवून त्यांची तस्करी केली होती.  बँकॉकहून मुंबईला आलेल्या प्रवाशांच्या ट्रॉली बॅगमध्ये मगरी ठेवण्यात आल्या होत्या. या पाचही मगरीच्या पिल्लांना मूळ देशात परत पाठवण्यात आले आहे . 
 


सम्बन्धित सामग्री