Wednesday, August 20, 2025 01:07:03 PM

‘अयोग्य, अन्याय्य आणि अवास्तव’: ट्रम्प यांच्या 50 टक्के आयात शुल्कावर भारताचे 5 कलमी प्रत्युत्तर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% पर्यंत कर वाढवण्याच्या निर्णयावर भारताने बुधवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. भारत देशहिताशी तडजोड करणार नाही, असे अमेरिकेला ठणकावून सांगण्यात आले.

‘अयोग्य अन्याय्य आणि अवास्तव’ ट्रम्प यांच्या 50 टक्के आयात शुल्कावर भारताचे 5 कलमी प्रत्युत्तर

India's Response On Trump’s Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत तेल व्यापार सुरू ठेवल्याबद्दल भारताला अधिक आयातशुल्क लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत विस्तृत आणि स्वच्छ शब्दांत ही प्रतिक्रिया देताना भारताची बाजू जगासमोर मांडली आहे. ट्रम्प यांच्या अयोग्य आणि अन्याय्य पद्धतीने आणलेल्या या टॅरिफनंतरही भारत स्वतःच्या हिताचे निर्णय ठामपणे घेत राहील आणि देशाच्या हितासोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे अमेरिकेला स्पष्टपणे सुनावले आहे.

दंड करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर हे विधान आले. परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयावर “अन्याय्य, अन्याय्य आणि अवास्तव” अशी टीका केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% पर्यंत कर वाढवण्याच्या निर्णयावर भारताने बुधवारी प्रतिक्रिया दिली, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) जाहीर केले की नवी दिल्ली “आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करेल.”

हेही वाचा - अमेरिकेकडून आयात शुल्क दुप्पट! आता टॅरिफ 50% झाल्याने अडचणी, या व्यवसायांवर परिणाम होईल

ट्रम्प यांनी रशियासोबत तेल व्यापार सुरू ठेवल्याबद्दल भारताला 25% अतिरिक्त कर लावत दंड करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर भारताकडून ताबडतोब यावर प्रत्युत्तर देण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या या निर्णयावर 'अयोग्य, अन्याय्य आणि अवास्तव” अशी टीका केली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या पाच कलमी प्रतिसादाचा तपशील असा आहे:
अमेरिका भारताच्या तेल व्यापाराला लक्ष्य करत आहे (US targeting India’s oil trade)
“अलीकडच्या काळात अमेरिकेने रशियाकडून भारताच्या तेल आयातीला लक्ष्य केले आहे.”
 
भारत सार्वभौम ऊर्जा सुरक्षेचा पुनरुच्चार करतो (India reiterates sovereign energy security)
“आम्ही या मुद्द्यांवर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. यामध्ये आमची आयात बाजारपेठेच्या घटकांवर आधारित आहे आणि भारतातील 1.4 अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या एकंदरित उद्देशाने ती केली जाते.”

निवडून लक्ष्य करणे (Selective targeting)
“म्हणूनच, अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेणे अत्यंत दुर्दैवी आहे. इतर अनेक देश त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी करत असलेल्या कृतींसाठी भारतावर अतिरिक्त शुल्क लादणे दुर्दैवी आहे.”(इतर त्यांच्या देशहितासाठी आवश्यक त्या गोष्टी करत आहेत. मग या देशांवर कोणतीच कृती नाही आणि भारतालाच का लक्ष्य केले जात आहे?) 

शुल्क नाकारणे (Rejection of the tariffs)
“आम्ही पुन्हा सांगत आहोत की, या कृती अयोग्य, अन्याय्य आणि अवास्तव आहेत.”

ठाम इशारा (Firm Warning)
“भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती करेल.”

गेल्या आठवड्यात, ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केले होते की, रशियामधून संरक्षण साहित्य आणि ऊर्जा संसाधने आयात करत असल्याबद्दल  भारतावर 25 टक्के शुल्क आणि अतिरिक्त अनिर्दिष्ट शुल्क “दंड” लादला जाईल. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी घोषणा केली की, ते रशियन तेलापासून नफा मिळवल्याबद्दल भारतावर अतिरिक्त शुल्क लादतील.

सोमवारी, जयस्वाल म्हणाले होते की, अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाकडून तेल आयात करण्यासाठी भारताला लक्ष्य केले आहे. परंतु, ही आयात सुरू झाली; कारण, त्याचा पारंपरिक पुरवठा युरोपकडे वळवण्यात आला होता आणि त्यावेळी अमेरिकेने "जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिरता मजबूत करण्यासाठी भारताकडून होत असलेल्या अशा आयातीला सक्रियपणे प्रोत्साहन दिले होते".

हेही वाचा - आरबीआयची घोषणा... रेपो रेटमध्ये बदल नाही, सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होणार नाही


सम्बन्धित सामग्री