Wednesday, August 20, 2025 08:34:01 PM

Valentine Day 2025 : प्रेमामुळे आयुष्य बनतं सदाबहार आणि Kiss करण्यामुळं प्रेम होतं वृद्धिंगत.. अशी असते केमिस्ट्री

Kiss Benefit : चुंबनामुळे केवळ रिलेशनशिपच तणावमुक्त राहत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामुळे किस डे हा व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरा केला जातो. किस करण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ

valentine day 2025  प्रेमामुळे आयुष्य बनतं सदाबहार आणि kiss करण्यामुळं प्रेम होतं वृद्धिंगत अशी असते केमिस्ट्री

Valentine Day 2025 : अनेक कवी, उर्दू गझलकारांनी प्रेमाशिवाय जीवनच असह्य होत असल्याची कल्पना मांडली आहे. तर, प्रेमामुळं आकाशसुद्धा ठेंगणं वाटत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. प्रेम ही गोष्ट आयुष्यभर अनुभवली तरच ती आपल्याला पुरुन उरते आणि किस करणं हा तर प्रेमातला अविभाज्य भागच..! तुम्हाला कदाचित माहीत नसेल, चुंबनामुळे केवळ रिलेशनशिपच तणावमुक्त राहत नाही तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. 

चला, किस करण्याचे फायदे जाणून घेऊयात.

ताणतणाव कमी होतो
तज्ज्ञांच्या मते, जोडीदारासोबत अनुभवलेलं रोमँटिक किस शरीरातून 2 ते 26 कॅलरीज कमी करते. कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्र-मैत्रिणींना किस करण्याचेही अनेक मानसिक आणि शारीरिक फायदे असतात. अहवालात असे म्हटले आहे की चुंबनामुळे व्यक्तीचा ताण कमी होतो. अभ्यासानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती बराच वेळ चुंबन घेते, तेव्हा त्यामुळे तणावाची पातळी कमी होऊ लागते. 

हेही वाचा - Valentine’s Day Sale: विमान कंपन्यांकडून खास सवलत; 'या' कंपनीने दिलीय 50 टक्क्यांची सूट

हृदयाच्या समस्यांमध्ये फायदा होऊ शकतो
चुंबन घेतल्याने हृदयाच्या समस्या दूर होऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचं चुंबन देता तेव्हा या काळात शरीरात अॅड्रेनालाईन नावाचा हार्मोन तयार होतो, जो हृदयासाठी खूप चांगला असतो. असे म्हटले जाते की, चुंबनामुळे लठ्ठपणा कमी होतो. चुंबनामुळे कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे चयापचय दर देखील वाढू शकतो. याचाही हृदयाला फायदा होतो.
 

आनंदी हार्मोन्स
चुंबन घेतल्याने तुमच्या मेंदूमध्ये रसायनांचा एक समूह बाहेर पडतो. त्यामुळे मनात चांगल्या आणि सकारात्मक भावना येतात. त्यात ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायने असतात, जी तुमच्या भावना आणि बंध मजबूत करण्यास मदत करतात. चुंबन घेतल्याने पुरुषांचे वय देखील वाढते, असे अहवालात म्हटले आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक चुंबन घेतात ते जे चुंबन घेत नाहीत त्यांच्यापेक्षा ५ वर्षांपर्यंत जास्त काळ जगू शकतात.

हेही वाचा - Valentine Day 2025: रोज एखाद्याला मिठी मारल्यास हृदयाच्या आरोग्यावर होतो 'असा' परिणाम

रक्तदाब नियंत्रित होतो
चुंबन घेतल्याने आपल्या रक्तवाहिन्या रुंद होतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. चुंबन घेतल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रित होतो असे अहवालात म्हटले आहे. चुंबनामुळे केवळ रिलेशनशिपच तणावमुक्त राहत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामुळे किस डे हा व्हॅलेंटाईन वीकच्या सातव्या दिवशी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मात्र, जीवनात चुंबनाचं महत्त्व केवळ व्हॅलेंटाईन डे पुरतं नसून ते संपूर्ण आयुष्यासाठी आहे.


सम्बन्धित सामग्री