Sunday, August 31, 2025 01:34:46 PM

कल्याणप्रकरणी नराधम विशालसह पत्नीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नराधम विशालसह पत्नी साक्षीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याणप्रकरणी नराधम विशालसह पत्नीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

कल्याण : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नराधम विशालसह पत्नी साक्षीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. विशाल गवळी या गुंड्याने तिची क्रूरपणे हत्या केली. नराधम विशालचा ताबा कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी आरोपी विशालची शेगावात वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यात आली आणि आता वैद्यकीय चाचणीचा अहवाल कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.  

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सलूनमधून विशाल गवळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुलढाण्यातील शेगावमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गवळीला ताब्यात घेतल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळी याची मेडिकल करून त्याचा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

 

या घटनेमुळे कल्याणच्या कोळसेवाडीतील रहिवाशांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली गेली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारावर कल्याणमधील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

हेही वाचा : कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्या

 

नेमकं प्रकरण काय?

कल्याणमधील कोळशेवाडी परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. अत्याचार करून बांपगाव परिसरात तिची हत्या करण्यात आली. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल हा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात मुलीली रिक्षात घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला या आधीच अटक करण्यात आली आहे. गवळी हा बलात्कार, पॉक्सो गुन्ह्यांतर्गत तडीपार होता. या घटनेमुळे कल्याणमधील कोळशेवाडीतील रहिवाशांनी एकत्र येऊन मोर्चा काढला आहे. कल्याणमधील नागरिक संतप्त झाले आहेत. या घटनेमुळे कल्याणमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राजकीय नेत्यांकडूनही कठोर कारवाईची मागणी होत आहे.


सम्बन्धित सामग्री