Monday, September 01, 2025 10:03:42 PM

Vodafone Idea ने भारतात सुरू केली 5G सेवा! सध्या 'या' शहरातील लोकांनाचं मिळणार लाभ

Vi ने त्यांच्या वेबसाइटवर 5G साठी एक मायक्रोसाइट देखील लाँच केली आहे, जिथे वापरकर्ते नेटवर्क कव्हरेजबद्दल माहिती मिळवू शकतात आणि नवीन 5G प्लॅन एक्सप्लोर करू शकतात.

vodafone idea ने भारतात सुरू केली 5g सेवा सध्या या शहरातील लोकांनाचं मिळणार लाभ
Vodafone Idea launches 5G service in India
Edited Image

Vodafone Idea Launches 5G Service in India: व्होडाफोन आयडिया (Vi) ने अखेर भारतात त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. कंपनीचे 5G नेटवर्क सध्या मुंबईत सुरू करण्यात आले आहे. लवकरच ते बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये सुरू केले जाईल. Vi ने त्यांच्या वेबसाइटवर 5G साठी एक मायक्रोसाइट देखील लाँच केली आहे, जिथे वापरकर्ते नेटवर्क कव्हरेजबद्दल माहिती मिळवू शकतात आणि नवीन 5G प्लॅन एक्सप्लोर करू शकतात. खास गोष्ट म्हणजे Vi त्यांच्या सर्व 5G प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देत आहे.

कोणत्या शहरात सुरू झाली Vodafone Idea 5G सुविधा - 

वापरकर्ते Vi वेबसाइटला भेट देऊन त्यांच्या सर्कलचे 5G कव्हरेज तपासू शकतात. सध्या, 5G सेवा फक्त मुंबईतच सक्रिय आहे. बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये पुढील काही दिवसात 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - Amazon Layoffs: अमेझॉनचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! 14000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

Vi 5G प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन - 

Vi चे 5G प्रीपेड प्लॅन 299 रुपयांपासून सुरू होतात, जे 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1 जीबी डेटा देतात. 349 रुपयांच्या आणि 365 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज अनुक्रमे 1.5GB आणि 2 जीबी डेटा मिळतो. कंपनीचा सर्वात महागडा प्रीपेड प्लॅन 3,599 रुपयांचा आहे, जो 365 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 जीबी डेटा देतो. या सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा सुविधा दिली जात आहे.

Vi चे पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी चार नवीन प्लॅन -  

Vi ने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी चार नवीन प्लॅन सादर केले आहेत. Vi Max 451 आणि Vi Max 551 ची किंमत अनुक्रमे 451 आणि 551 रुपये आहे आणि ते 50GB आणि 90GB डेटा देतात. Vi Max 751 प्लॅनमध्ये 751 रुपयांमध्ये 150GB डेटा मिळतो, तर REDX 1201 प्लॅनमध्ये 1,201 रुपयांमध्ये अमर्यादित डेटा मिळतो. सर्व पोस्टपेड प्लॅनना अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील मिळेल, जर वापरकर्ता 5G कव्हरेज क्षेत्रात असेल.

हेही वाचा - Asia Longest Hyperloop Tube: IIT च्या विद्यार्थ्यांनी बनवली आशियातील सर्वात लांब हायपरलूप ट्यूब; पहा व्हिडिओ

Vi ची अमर्यादित 5G डेटा ऑफर - 

दरम्यान, Vi ची अमर्यादित 5G डेटा ऑफर सध्या प्रमोशनल ऑफर म्हणून दिली जात आहे. ती कायमस्वरूपी असणार नाही. विशेष म्हणजे, 2GB/दिवसापेक्षा कमी डेटा असलेल्या प्लॅनवरही अमर्यादित 5G डेटा देणारा Vi हा भारतातील पहिला टेलिकॉम ऑपरेटर बनला आहे. जिओ आणि एअरटेल फक्त त्या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देतात जे दररोज किमान 2GB डेटा देतात.


सम्बन्धित सामग्री