चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवा.. हे ते आपण ऐकलंच असेल पण तुम्ही जर कॉफीचे फायदे ऐकले तर तुम्ही कॉफी प्रेमी व्हायला वेळ लागणार नाही. कॉफी शरीरासाठी घातक असल्याचं नेहमी बोललं जात परंतु तुम्हाला माहितीय का कॉफीने पिल्याने तुमचं आयुष्य वाढू शकत. जर आपण योग्य प्रमाणात कॉफी प्यायलो तर आयुष्य वाढतं. त्यातही 1.8 वर्ष इतकं आपलं आयुष्य वाढतं. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात कॉफी प्यायलात तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढेल.
कॉफी प्यायल्याने आयुष्य कसे वाढते?
कॉफीचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव
कॉफी शरीरातील जळजळ आणि चयापचय (मेटाबॉलिझम) यांसारख्या प्रमुख आरोग्यनिर्देशकांवर चांगला प्रभाव टाकते. संशोधकांनी स्मोकिंग, मद्यपान यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित घटकांवर लक्ष केंद्रित करून केवळ कॉफीचे परिणाम वेगळे काढले आहेत.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
कॉफी पिणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार, स्ट्रोक, कर्करोग, मधुमेह, डिमेंशिया आणि मानसिक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. शिवाय, स्नायूंचे आरोग्य, हृदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता, मानसिक स्वास्थ्य आणि प्रतिकारशक्ती यावरही सकारात्मक परिणाम होतो.
कॉफीची योग्य प्रमाणात सेवनाची गरज
या संशोधनाचे सहलेखक, न्यूरोसायंटिस्ट रॉड्रिगो कुन्हा यांनी सांगितले की, “कॉफीचे फायदे पारंपरिक वैद्यकीय शिफारसींमध्ये दुर्लक्षित केले गेले होते. मात्र, योग्य प्रमाणात सेवन केल्यास ती वृद्धत्वामुळे होणाऱ्या बायोलॉजिकल प्रक्रियांना प्रतिबंध करते.”
कॉफी हे फक्त उर्जावर्धक पेय नसून, ती तुमच्या आयुष्याला आरोग्यदायी आणि दीर्घायुषी बनविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. पोर्तुगालमधील युनिव्हर्सिटी ऑफ कोइंब्रा येथे करण्यात आलेल्या संशोधनाने या पेयाचे आरोग्यावर होणारे अनेक सकारात्मक परिणाम उघड केले आहेत. त्यामुळे आता योग्य प्रमाणात कॉफी प्यायलात तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढू शकणार आहे.