मुंबई : मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीत कमालीचे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी उघड करत थेट अजित पवार यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. नाराज भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा असा सूर काही भुजबळ समर्थकांनी व्यक्त केला होता. भाजपा नेत्यांनीही भुजबळ प्रवेशावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. योगायोगाने शुक्रवारी सावित्रीमाई उत्सवाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकत्र प्रवास केल्यामुळे भुजबळांची भाजपाशी दिलजमाई सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
हेही वाचा : बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे?
भुजबळ आणि भाजपा
राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते असतानाही भूजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू
पक्षाने जाणिवपूर्वक डावललं असल्याचा भुजबळांचा दावा
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि अजित पवारांनी दिलेले शब्द न पाळल्याचा भुजबळांचा दावा
मंत्रीपद न मिळालेल्या भुजबळांची हिवाळी अधिवेशनात अनुपस्थिती
नाशिकमध्ये भुजबळांनी ओबीसी मेळावा घेत नाराजी उघड केली
भुजबळ समर्थकांकडून भुजबळांनी भाजपात जाण्याची मागणी
भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात राजकीय चर्चा
भाजपा प्रवेशावर भुजबळांकडून अद्याप मौन
मात्र, भाजपा नेत्यांची भुजबळांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
भाजपा प्रवेशाला विलंब का?
भुजबळांच्या भाजपा प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा आहे. भुजबळांवरील मागील काही आरोपांमुळे त्यांच्या प्रवेशाबाबत दुमत आहे. महायुतीतील नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात घेवू नये असा एक मतप्रवाह आहे. भुजबळांना भाजपात घेतल्यास त्यांना कोणती जबाबदारी देणार आहेत. भुजबळ ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या सन्मानाचे पद द्यावे लागणार आहे. भुजबळ भाजपात आल्यावर ओबीसी नेता म्हणून किती फायदा होणार याची चाचपणी केली जाणार आहे. भुजबळांना भाजपात घेतल्यास राष्ट्रवादीची नाराजी ओढवून घ्यावी लागेल, असेही मत व्यक्त केले जात आहे. भुजबळ मूळचे शिवसैनिक असल्याने त्यांनी शिवसेनेत जावं अशीही चर्चा सुरू आहे. शिवसेनेत भुजबळांनी यावं याबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही.
हेही वाचा : सुख कळले, सूर जुळले; सामनातून फडणवीसांचे कौतुक
भुजबळ यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घ्यावा असं मत भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी कळवलं आहे. भुजबळांचे 'राजकीय बळ' त्यांची पुढील दिशा ठरवणार आहे.
भुजबळ कमळ हाती घेणार ?