Sunday, August 31, 2025 02:04:19 PM

NSE Holidays 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार का? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

एनएसईने जाहीर केलेल्या 2025 च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या संपूर्ण वर्षात शेअर बाजार एकूण 14 दिवस बंद राहील.

nse holidays 2025 महाशिवरात्रीच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार का जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
Stock Market Holiday 2025
Edited Image

Stock Market Holiday 2025: महाशिवरात्रीनिमित्त बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) बंद राहतील. या दिवशी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि कमोडिटी मार्केटमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. 2025 सालची ही पहिली व्यापारी सुट्टी आहे. या वर्षी एकूण 14 शेअर बाजाराच्या सुट्ट्या नियोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सर्व निर्देशांक, निफ्टी 50 आणि सेन्सेक्स या प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांसह बंद राहतील.

शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी - 

एनएसईने जाहीर केलेल्या 2025 च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या संपूर्ण वर्षात शेअर बाजार एकूण 14 दिवस बंद राहिल. महाशिवरात्रीला शेअर बाजार बंद राहण्याव्यतिरिक्त, मार्चमध्ये दोन सुट्ट्या असतील ज्यामध्ये 14 मार्च (शुक्रवार) रोजी होळी आणि 31 मार्च (सोमवार) रोजी ईद-उल-फित्र यांचा समावेश असेल.

हेही वाचा - 'हा' ग्रुप भारतात करणार 5 हजार कोटींची गुंतवणूक; 15 हजार जणांना मिळणार रोजगार

एप्रिल महिन्यात 'या' दिवशी शेअर मार्केट राहणार बंद - 

एप्रिलमधील सुट्ट्यांमध्ये 10 एप्रिल (गुरुवार), 14 एप्रिल (सोमवार) रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती आणि 18 एप्रिल (शुक्रवार) रोजी गुड फ्रायडे यांचा समावेश असेल. याशिवाय, महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे (गुरुवार) रोजी देशांतर्गत शेअर बाजार देखील बंद राहतील. 2025 च्या पहिल्या सहामाहीतील ही शेवटची सुट्टी असेल.

तथापी, ऑगस्टमध्ये, स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट, शुक्रवार) आणि गणेश चतुर्थी (27 ऑगस्ट, बुधवार) रोजी शेअर बाजार बंद राहील.

हेही वाचा गेल्या 20 दिवसांत राम मंदिराला मिळाली 'इतकी' देणगी! मोजणही झालं कठीण

ऑक्टोबरमध्ये शेअर बाजार 3 दिवस बंद राहणार - 

ऑक्टोबरमध्ये अनेक सुट्ट्या असतील. यामध्ये 2 ऑक्टोबर (गुरुवार), 21 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी दिवाळी लक्ष्मीपूजन आणि 22 ऑक्टोबर (बुधवार) रोजी दिवाळी-बलिप्रतिपदाच्या दिवशी शेअर मार्केट बंद असेल. तसेच गुरुपौर्णिमानिमित्त 5 नोव्हेंबर (बुधवार) रोजी आणि 25 डिसेंबर (गुरुवार) रोजी ख्रिसमसला शेअर मार्केट बंद राहिलं. 

शेअर बाजाराची वेळ - 

भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराचे तास सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत आहेत. नियमित कामकाजाच्या दिवशी प्री-ओपन सत्र सकाळी 9:00 ते 9:15 पर्यंत चालते. तथापी, शनिवार आणि रविवारी बाजार बंद असतो.
 


सम्बन्धित सामग्री