महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेसंदर्भात ही बातमी आहे. पीएम किसान योजनेची रक्कम वाढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत तकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. परंतु आता ही रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
काय आहे पीएम किसान योजना?
अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात 1-12-2018 पासून राबवण्यास सुरुवात झाली. 2 हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये 2000 म्हणजेच वार्षिक 6000 अर्थसाह्य दिले जाते. या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.
दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी चरणजीत सिंह चन्नी यांनी ही मागणी लोकसभेत मांडली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत रक्कम मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
कोणकोणते लाभार्थी अपात्र आहेत?
जमीन धारण करणारी संस्था
संवेधानिक पद धरण केलेली आजी माजी व्यक्ती
आजी माजी सर्व मंत्री
आजी माजी आमदार खासदार
आजी माजी महापौर जि. प.अध्यक्ष
आयकर भरणारी व्यक्ती
निवृत्ती वेतन 10000 पेक्षा जास्त घेणारी व्यक्ती
नोंदणीकृत डॉक्टर वकील अभियंता
दरम्यान आता पीएम किसान योजनेची रक्कम वाढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून येत्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होणार असल्याचं समोर आल आहे.