कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रिल्स केल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेमधील व्हायरल झालेला व्हिडिओ दोन आठवड्यापूर्वीचा असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या रीलसाठी मुख्यध्यापकांनीच परवानगी दिल्याचे समजल्यावर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.
हेही वाचा : सुख कळले, सूर जुळले; सामनातून फडणवीसांचे कौतुक
या घटनेवरून समाजमाध्यमांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यादानाचे काम करणाऱ्या शाळेतील वर्गात असलेल्या खुर्चीला लाथ मारण्याचा प्रकार निषेधार्थ असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा : बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे?
नेटकऱ्यांचा संताप काय?
जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना रील्सची परवानगी का दिली?
जिथं शिकलो, तिथं लाथ मारल्यासारखा प्रकार कसा होवू शकतो?
मुख्याध्यापकांनी याला परवानगी का दिली?
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
या प्रकरणातील दोषांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
शाळांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले जात असताना शाळेने परवानगी का दिली?
रील्स बनत असताना शाळा समिती काय करत होती?
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
शाळेत 'सिंघम' रील बनल्याने शाळेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.