Health Scheme: सध्याच्या काळात वाढत्या महागाईमुळे आरोग्यसेवा सामान्य कुटुंबांसाठी खर्चिक झाली आहे. गंभीर आजारांवर उपचार घेणं तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी फार कठीण ठरतं. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो.
आयुष्मान भारत योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही देशातील गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांसाठी आरोग्य विमा योजना आहे. यामध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आयुष्मान कार्ड’ बनवणं गरजेचं आहे.
कोण पात्र आहे?
या योजनेचा लाभ 70 वर्षांवरील नागरिकांना मिळतो, त्यांचं उत्पन्न कितीही असो. तसेच ज्यांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही, अशा व्यक्तीही पात्र आहेत. मात्र आयकर भरणारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व पीएफ किंवा ईएसआयसीचे सदस्य या योजनेसाठी पात्र नाहीत.
हेही वाचा: Do Not Peel Soaked Almonds: भिजवलेले बदाम सोलून खाताय? जाणून घ्या पोषणतज्ज्ञांचा सल्ला
पात्रता तपासायची कशी?
1. beneficiary.nha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. ‘मी पात्र आहे का’ या पर्यायावर क्लिक करा.
3. आपला मोबाईल नंबर टाका आणि ओटीपीने पडताळणी करा.
4. नाव, राज्य, जिल्हा भरल्यानंतर पात्रतेची माहिती समजते.
हेही वाचा: Fruits to avoid during monsoon: पावसाळ्यात 'ही' 5 फळ खाणं आहे धोकादायक; जाणून घ्या
कोणते आजार या योजनेत समाविष्ट आहेत?
हृदयरोग व उपचार: हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत.
कर्करोग: स्तन, गर्भाशय, तोंड, पचनसंस्था व फुफ्फुसाचा कर्करोग; केमोथेरपी व रेडिएशन थेरपीसह.
न्यूरोलॉजिकल विकार: स्ट्रोक, अर्धांगवायू, ब्रेन ट्यूमर, एपिलेप्सी, स्पाइनल कॉर्ड विकार व पार्किन्सन.
मूत्रपिंड व मूत्रमार्गाचे आजार: डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांट, युरीन इन्फेक्शन व क्रॉनिक किडनी डिसीज.
यकृत व पचनसंस्थेचे विकार: लिव्हर सिरोसिस, हेपेटायटीस बी व सी, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स व हर्निया शस्त्रक्रिया.
श्वसन विकार: दमा, टीबी, न्यूमोनिया, सीओपीडी व फुफ्फुस विकार.
हाड व सांधे विकार: हिप व गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर, संधिवात व ऑस्टियोपोरोसिस.
प्रसूती व स्त्रीरोग: सामान्य व सिझेरियन प्रसूती, हिस्टेरेक्टॉमी.
इतर उपचार: जळालेल्या जखमा, नवजात शिशु काळजी, मानसिक विकार, जन्मजात दोष, अस्थिमज्जा प्रत्यारोपण.
खर्चात काय समाविष्ट आहे?
या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या तपासण्या, निदान, औषधे, शस्त्रक्रिया, हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च आणि उपचारानंतरची देखभाल यांचाही समावेश आहे.
आयुष्मान भारत योजना ही गरीब व वंचितांसाठी आरोग्य सुरक्षेचा मोठा आधार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी पात्रता तपासून आयुष्मान कार्ड तात्काळ तयार करणे आवश्यक आहे.