Saturday, September 06, 2025 03:52:39 AM

सावधान! तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपाल तर...

थंडगार वातावरणात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार रजाई-ब्लॅंकेट अंगावर घेऊन झोपण्याची मजाच वेगळी असते.

सावधान तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपाल तर
Samruddhi Sawant


मुंबई :  थंडीची चाहूल लागताच आपल्याला आठवतात थंड गार आणि आरामाचे दिवस एकदाची गर्मी आणि तो उन्हाळा गेला आता थंडगार वातावरणात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार रजाई-ब्लॅंकेट अंगावर घेऊन झोपण्याची मजाच वेगळी असते. मात्र, ही मजा आनंद देतेच पण त्याचबरोबर घातकही ठरू शकते पण का ? याचं खरं कारण सगळ्यांना माहित नसतं . जास्तीत जास्त लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपतात. याने थंडीपासून तुमचा बचावही होतो, पण आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा धोकाही वाढतो. तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात तुम्हाला ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपण्याचे काय तोटे आहेत हे  माहीत असणं गरजेचं आहे. 

त्वचेसाठी नुकसानकारक

हिवाळ्यात जेव्हा तुम्ही तोंडावर ब्लॅंकेट घेऊन झोपता तेव्हा पुरेसे ऑक्सीजन ब्लॅंकेटमध्ये येत नाही आणि त्याचबरोबर अशुद्ध हवा सुद्धा ब्लॅंकेटमधून बाहेर जात नाही. सोबतच याने त्वचेवर सुरकुत्याही पडू शकतात. त्याशिवाय हिवाळ्यात तोंड झाकून झोपल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीतपणे होत नाही, चेहऱ्यावर पिंपल्स आणि पुरळ येणे अश्या समस्या येतात आणि या कारणामुळे तुमच्या चेहऱ्याची खराबी होऊ शकते. 

फुप्फुसांसाठी नुकसानकारक

तोंडावर ब्लॅंकेट घेणं फुफुसांवरही महागात पडतं . अशाप्रकारे झोपल्याने फुप्फुसात हवा योग्यपणे अदलाबदल होत नाही. ज्यामुळे फुप्फुसं आकुंचन पावतात. अशात अस्थमा, डिमेंशिया किंवा डोकेदुखीची समस्या वाढू शकते. ज्या लोकांना आधीच अस्थमाची समस्या आहे त्यांनी चुकूनही अशाप्रकारे झोपू नये.

 हार्ट अटॅकचा धोका

जे लोक ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपतात त्यांना हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो. असं केल्याने शरीराला योग्यपणे ऑक्सीजन मिळत नाही. ज्याचा थेट प्रभाव हार्टवर पडतो. अशा स्थितीत हार्ट अटॅक किंवा श्वास गुदमरण्याचा धोका वाढतो. त्याशिवाय ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपल्याने चक्कर किंवा मळमळही जाणवू शकते.

वजन वाढतं
ब्लॅंकेटमध्ये तोंड झाकून झोपल्याने अप्रत्यक्षपणे याचा प्रभाव शरीराच्या वजनावरही पडतो. तोंड झाकून झोपल्याने शरीराला गरमी मिळते, ज्यामुळे कोणतीही व्यक्ती जास्त वेळ झोपते. जेवढा जास्त वेळ तुम्ही झोपाल शरीराचं मेटाबॉलिज्म हळुवार काम करतं, ज्यामुळे शरीराचं वजन वाढतं.


सम्बन्धित सामग्री