मुंबई: पावसाळा सुरु झाला म्हटलं की लोकांना भिजायला आवडते. तर काही जण रोज कामानिमित्त ऑफिसला जातात. मात्र त्याचवेळी नेमका पाऊस येतो. त्यामुळे आपण भिजतो आणि कपडे ओले होतात. आपण भिजलेल्या अवस्थेत आफिसमध्ये काम करत असतो. मात्र त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. हे तुम्हाला माहिती आहे का? यामुळेच तुम्हाला फंगल इंफेक्शन होऊ शकते. फंगल इंफेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इंफेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो?, जाणून घेऊयात.
फंगल इंफेक्शनची कारणे काय?
● उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते.
● ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
● ओले कपडे घालणे.
● घट्ट शूज किंवा कपडे घालणे.
● खूप वेळ मोजे घालणे.
● वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे.
● प्रतिजैविक औषधांचे दुष्परिणाम
● कमजोर रोगप्रतिकार शक्ती
1. कँडीडा अल्बिकन्स : हे एक फंगल इंफेक्शन असून ते त्वचेवर, तोंडाजवळ गुप्तांगाजवळच्या ओलसर त्वचेवर होते.
2. रिंगवर्म : हे सुद्धा एक फंगल इंफेक्शन आहे. जे प्रामुख्याने त्वचेवर, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर आणि गुप्तांगाजवळ होते.
हेही वाचा: केस धुण्यासाठी थंड की गरम कोणते पाणी योग्य? ते आठवड्यातून किती वेळा धुवावे? जाणून घ्या
काय काळजी घ्यावी?
◼️ वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या.
◼️ स्नानगृह किंवा सार्वजनिक अंघोळीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगा.
◼️ सतत एकच मोजे घालू नका.
◼️ खूप घट्ट शूज घालू नका.
◼️ कोणाचीही वस्तू वापरू नका.
◼️2.5 PH चे ॲसिडीक पाणी दिवसातून 3-4 वेळा बाधित जागेवर स्प्रे करावे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)