Green Chilli Benefits: हिरवी मिरची हा आपल्या स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग आहे. ती जेवणाला चव तर देतेच, पण आरोग्यासाठीही अनेक प्रकारे उपयुक्त ठरते. हिरव्या मिरच्यांमध्ये जीवनसत्त्व अ, क, के, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक शरीराला निरोगी ठेवण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
आयुर्वेदात हिरव्या मिरच्यांना कुमरीच असे म्हटले जाते. त्यात असलेले कॅप्सेसिन हे घटक चयापचय वाढवतात आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवतात. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय, हिरव्या मिरच्या मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात कारण त्या रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.
थकवा आणि डोकेदुखीपासून आराम
हिरव्या मिरच्यांचे नियमित सेवन केल्यास थकवा, डोकेदुखी आणि निद्रानाश यांसारख्या समस्या कमी होतात. त्यातील पोषक घटक शरीराला डिटॉक्स करतात आणि शरीर हलके व ऊर्जावान बनवतात.
सर्दी आणि संसर्गावरील संरक्षण
हिरव्या मिरच्यांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे सर्दी, खोकला आणि बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण करतात. ते आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया कमी करतात तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.
हेही वाचा - Pumpkin Seeds Benefits: मधुमेह नियंत्रणापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत भोपळ्याच्या बिया आहेत वरदान!
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, मिरचीतील पोषक घटक रक्ताच्या गुठळ्या, लठ्ठपणा, मधुमेह, कर्करोग आणि जीवाणूंमुळे होणाऱ्या आजारांपासून शरीराचे रक्षण करतात. त्यात असलेले कॅप्सेसिन वेदना कमी करणारे नैसर्गिक घटक आहे. काही संशोधनांमध्ये असेही दिसून आले आहे की हे विषाणूजन्य आजार, अगदी कोरोनासारख्या संक्रमणातही उपयुक्त ठरू शकते.
हेही वाचा - Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे 'या' समस्या जाणवतात, जाणून घ्या
हिरव्या मिरच्या कधी आणि कशा खाव्यात?
तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी हिरवी मिरची खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ताजेतवाने ऊर्जा मिळते. तुम्ही हिरव्या मिरच्या भाज्यांमध्ये, सॅलडमध्ये, चटणीत किंवा लोणच्यांमध्ये वापरू शकता. तथापी, हिरव्या मिरचीच्या सेवनाचे अनेक फायदे असेल तरी त्यांचे अति सेवन टाळावे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ, आम्लपित्त किंवा इतर त्रास होऊ शकतो. मूळव्याध असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र मर्यादित प्रमाणात हिरव्या मिरच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)