Under-Eye Wrinckels : चेहऱ्यावर सुरकुत्या कोणालाच आवडत नाहीत. सुरकुत्या दिसू लागल्या की अनेकांचे टेन्शन वाढते, सुरकुत्यांमुळे व्यक्ती लवकर वयस्क वाटू लागते. बऱ्याच लोकांच्या डोळ्यांखाली सुरकुत्या पडतात. या डोळ्यांखालील सुरकुत्या (wrinkles) घालवण्यासाठी काही सोपे उपाय आणि योगासने आहेत, ते तुम्ही घरीही सहज करू शकता. या सुरकुत्या येण्यामागे अनेक कारणे असतात, वाढतं वय, तणाव, झोपेचा अभाव, किंवा सूर्याच्या हानिकारक किरणांचा परिणाम.
डोळ्यांखालील सुरकुत्या कमी करण्यासाठीचे उपाय -
चांगल्या प्रतीची मॉइश्चरायझर वापरा: डोळ्यांखालील त्वचा खूप नाजूक असते. यासाठी हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतीची डोळ्यांसाठी खास तयार केलेली (Eye Cream) किंवा व्हिटॅमिन ई असलेली मॉइश्चरायझर वापरा. मॉइश्चरायझर लावताना बोटांनी हलका मसाज करा.
पुरेसे पाणी प्या: शरीराला आतून हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्यास त्वचा लवचिक राहते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
पुरेशी झोप घ्या: रोज 7 ते 8 तास शांत झोप घ्या. झोपेच्या वेळी त्वचेतील पेशींची दुरुस्ती होते. झोपेचा अभाव हे डोळ्यांखालील सुरकुत्या आणि काळ्या वर्तुळांचे (dark circles) एक प्रमुख कारण आहे.
सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव: प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचेला खूप नुकसान होते. घराबाहेर पडताना चांगल्या प्रतीचे सनग्लासेस (sunglasses) वापरा आणि एसपीएफ (SPF) असलेले सनस्क्रीन (sunscreen) लावा.
हेही वाचा - Banana Peel Benefits: केळीच्या सालीत दडलं आहे नैसर्गिक पोषण; संशोधकांनी केला 'हा' खुलासा
डोळ्यांखालील सुरकुत्यांसाठी योगासने -
डोळ्यांच्या आसपासच्या स्नायूंना आराम देण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी काही सोपी योगासने उपयुक्त आहेत.
पामिंग - डोळे बंद करा आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून गरम करा. आता हे गरम तळवे डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांवर कोणताही दाब येऊ देऊ नका. ही स्थिती 30 सेकंद ठेवा. असे 2-3 वेळा करा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
हलका मसाज - डोळ्यांच्या खालील बाजूस, आतील कोपऱ्यापासून बाहेरील कोपऱ्यापर्यंत हलक्या बोटांनी मसाज करा. दिवसातून 2-3 वेळा 30 सेकंदांसाठी हा मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
डोळ्यांची गोलाकार हालचाल (Eye Rotation): सरळ बसा आणि डोळ्यांची पापणी न मिचकावता डोळ्यांना घड्याळाच्या दिशेने (clockwise) आणि नंतर विरुद्ध दिशेने (anti-clockwise) हळू-हळू गोल फिरवा. हे 3-4 वेळा करा. यामुळे डोळ्यांचे स्नायू बळकट होतात.
डोळे मिटणे आणि उघडणे: डोळे घट्ट मिटून घ्या आणि नंतर शक्य तितके मोठे उघडा. ही क्रिया 5-10 वेळा पुन्हा करा. यामुळे डोळ्यांभोवतीच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. साधारणपणे असे उपाय आणि योगासने नियमित केल्यास डोळ्यांखालील सुरकुत्या निश्चितच कमी होतील. यासोबतच संतुलित आहार आणि ताण-तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब केल्यास उत्तम परिणाम दिसून येईल.
हेही वाचा - Alum Benefits: घामाचा वास दूर करण्यासाठी महागडे परफ्यूम नाही, फक्त तुरटी पुरेशी! जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत