Thursday, August 21, 2025 02:22:02 AM

Ideal Lifestyle After 35 : वयाच्या पस्तीशीनंतर या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका

शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली आणि आहार आवश्यक आहे. पस्तीशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. तेव्हा, आरोग्य, करिअर, नातेसंबंध आणि मानसिक संतुलन याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.

ideal lifestyle after 35  वयाच्या पस्तीशीनंतर या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका

Ideal Lifestyle After 35 : वयाच्या पस्तीशीनंतर आदर्श जीवनशैली कशी असावी? एका विशिष्ट वयानंतर अनेक गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. विशेषतः वयाच्या पस्तीशीनंतर आहार, व्यायामापासून ते आर्थिक व्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली आणि आहार आवश्यक आहे. पस्तीशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. अशा वेळी , आरोग्य, करिअर, नातेसंबंध आणि मानसिक संतुलन याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते.
 

पस्तीशीनंतर कोणत्या प्रकारची जीवनशैली असावी आणि कोणती कामे करावीत याविषयी काही टिप्स:
1. जीवनाचा आनंद घ्या
या वयात परिवाराला सर्वांत जास्त महत्त्व दिले जाते. मात्र, स्वतःसाठीही वेळ काढा आणि नवीन गोष्टी करून पहा. यातून तुम्हाला आनंदी जीवनसैलीसाठी आणखी ऊर्जा मिळेल. याबरोबर नवीन अनुभवांसाठी नवीन ठिकाणी प्रवास करा. 
2. मानसिक आरोग्य
तसं पाहिलं तर, मानसिक आरोग्य ही सर्वच वयोगटांतील महत्त्वाची बाब आहे. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी त्यांच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुम्ही ध्यान आणि प्राणायाम करू शकता, जे ताण कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचबरोबर पुस्तके वाचावीत आणि सकारात्मक विचार करावा यामुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.
3. येथे लक्ष केंद्रित करा
या वयातील लोकांनी करिअर आणि वैयक्तिक कौशल्यवाढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी, नवीन कौशल्ये शिका आणि करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी गुंतवणूक करा.
4. आर्थिक स्थिती
या वयात पैशांची बचत देखील महत्त्वाची आहे. याचा तुम्हाला मुलांची शिक्षणं, स्वतःच्या आणि घरातील इतरांच्या आरोग्य समस्या यांमध्ये उपयोग होऊ शकतो. यासाठी तुम्ही एसआयपी, म्युच्युअल फंड, पीपीएफ इत्यादी माध्यमातून गुंतवणूक सुरू करू शकता. आवश्यकता असेल तर, मेडिक्लेम, विमा योजनांचा विचार करावा. टर्म इन्शुरन्सचा नक्की विचार करावा. तसेच, अनावश्यक खर्च टाळावेत आणि भविष्यात कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून इमर्जन्सी फन्ड स्वतःच बाजूला काढून ठेवावा.

हेही वाचा -  Digestion: जेवल्यानंतर लगेच हे 2 पदार्थ चावून खा; पचनसंस्था जलद काम करू लागेल आणि सकाळी उठताच पोटही होईल साफ

5. नातेसंबंध कसे सांभाळावे?
35 वर्षांहून जास्त वयाच्या लोकांनी कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवावा. आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पागोष्टी केल्याने, शाळा-कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींसोबत गेट टुगेदर किंवा सहलीसारखे प्रोग्रॅम्स जरूर करावेत. दूरच्या लोकांसोबत फोनवरून संपर्कात राहिल्याने मन प्रसन्न राहील. मानसिक शांतीसाठी नकारात्मक गोष्टींपासून दूर रहावे.
6. चांगली झोप घ्यावी
या वयात सर्वच व्यक्तींनी नियमितपणे किमान 7-8 तास गाढ झोप घेतली पाहिजे. रात्री उशिरा जागे राहणे आणि स्क्रीनवर वेळ घालवणे मर्यादेत ठेवा. झोपण्यापूर्वी कॅफिन आणि पचनास कठीण असे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
7. निरोगी आहार
35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी प्रथिने, फायबर, निरोगी फॅट्स आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. दिवसातून किमान तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यावे. त्याच वेळी, हाडे मजबूत करण्यासाठी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ खावेत. रात्री झोपण्याच्या वेळेच्या आधी 2 ते 3 तास काही खाऊ नये. म्हणजेच, रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यात 2 ते 3 तासांचे अंतर असावे.
8. असे पदार्थ टाळावे
एका विशिष्ट वयानंतर, प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर आणि जंक फूडपासून दूर राहावे. हे पदार्थ रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणाबरोबरच हे अनेक आजारांचे मूळ आहेत.
9. व्यायाम
किमान 45 मिनिटे नियमितपणे शारीरिक हालचाल (योग, जिम, चालणे) करावी. स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी जोर-बैठका, धावणे हे प्रकार करणे आवश्यक आहे. बागेत काम करण्यामुळेही चांगला व्यायाम होतो.
10. यापासून दूर राहा
टीव्ही, क्रिकेट मॅच, सोशल मीडिया आणि मोबाईलवर जास्त वेळ वाया घालवू नका. स्क्रीन टाइम मर्यादित असावा आणि अनेकदा प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना वेळ देण्याचा प्रयत्न करा. लॉटरी-झटपट पैसे मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या स्कीम्सपासून दूर रहा. यामुळे आपला कष्टाचा पैसा फुकट जाऊ शकतो.

हेही वाचा - Cholesterol Reduce : कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटतेय? ही 3 धान्यं खायला सुरुवात करा; आतडे स्वच्छ होण्यापासून ते..

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक किंवा आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री