Thursday, August 21, 2025 02:13:35 AM

काश्मीर ते कन्याकुमारी... इथे मिळणार अप्रतिम साड्या

साड्या पौराणिक कथा, संस्कृती आणि वेगवेगळ्या कला दर्शवतात. चला तर जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारच्या साड्या परिधान करतात.

काश्मीर ते कन्याकुमारी इथे मिळणार अप्रतिम साड्या

साडी हा भारतीय पोशाख असून गेल्या अनेक वर्षांपासून परिधान केला जातो. अगदी राजा - महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत स्त्रिया मोठ्या प्रमाणात साड्या परिधान करतात. पूर्वीच्या काळांत राणी, महाराणी खास प्रकाराने बनलेल्या साड्या परिधान करायच्या. सोबतच, प्रत्येक राज्याची एक खास रेशमी साडी असते ज्या गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आहेत. पूर्वीच्या काळी साड्या हाताने बनवल्या जात होत्या. मात्र, वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे या साड्या आधुनिक मशीनच्या मदतीने बनण्यास सुरुवात झाली. या साड्या पौराणिक कथा, संस्कृती आणि वेगवेगळ्या कला दर्शवतात. चला तर जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारच्या साड्या परिधान करतात. 

1 - काश्मीरी कानी सिल्क साड्या - काश्मीर:

काश्मिरी कानी सिल्क साड्या ही नाजूक रेशमी कापड आणि गुंतागुंतीच्या सुईकामासाठी ओळखली जाते. या साड्या हातमागावरती तयार केल्या जातात. या पारंपरिक काश्मिरी सिल्क साड्या प्राचीन काळापासूनच भारताच्या कापडउद्योगातील महत्वाचा भाग आहे. म्हणून ही साडी भारतातील सर्वात सुंदर सिल्क साड्यांपैकी एक आहे. काश्मिरी कानी सिल्क साड्या आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. 

हेही वाचा: Secrets of Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरातील रहस्य ऐकताच व्हाल थक्क

2 - फुलकारी साडी - पंजाब:

फुलकारी साडी पंजाब राज्याशी संबंधीत असणाऱ्या साडीचा प्रकार आहे. धाग्याचे जे काम इथे केले जाते त्याला फुलकारी असे म्हणतात. याचा वापर करून जे साडी बनते त्याला फुलकारी साडी म्हणतात. फुलकारी साड्यांमध्ये चौकोन, त्रिकोण असे आकारदेखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या साड्या इतर साड्यांपासून वेगळ्या दिसतात. 

3 - बांधणी साडी - गुजरात:

बांधणी साडी गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नेसल्या जातात. या साड्यांना बनवण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने बांधले जाते. त्यामुळेच या साडीचे नाव बांधणी असे पडले. या साड्या गुजरात सोबतच राजस्थानमध्ये परिधान केले जाते. महत्वाच्या कार्यक्रमात या साड्या तेथील महिला नेसतात. या साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांचे रंग तेजस्वी असतो. लाल, केशरी, निळा, गुलाबी, अश्या अनेक रंगामध्ये या साड्या मिळतात. या साड्या सिल्क आणि कॉटनमध्येदेखील बनतात. 

हेही वाचा: उन्हाळ्यात सब्जा खाणे चांगले की चिया सीड्स?

4 - पैठणी - महाराष्ट्र:

पैठणी याला साड्यांची महाराणी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील अनेक स्त्रिया मोठ्या प्रमाणात पैठणी साड्या नेसतात. पैठणी साड्यांचे अनेक डिझाईन्स आपल्याला महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळतात. मोर, पोपट अश्या विविध प्रकारच्या डिझाईन्सच्या पैठणींना मोठी मागणी असते. 

 5 - कांजीवरम साडी - तामिळनाडू:

कांजीवरम साड्या खास शुद्ध तुतीच्या रेश्मापासून ही साडी बनवली जाते. दक्षिण भारतात या साड्या खास लग्नकार्यासाठी वापरतात. तिथे या साड्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. या साड्या केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात नेसतात. या साड्यांची सुरुवात 30 हजारापासून ते लाखोंच्या किमतीत होते. अभिनेत्री रेखा, विद्या बालन यांनी अनेक कार्यक्रमात कांजीवरम साड्या परिधान केल्या. 


सम्बन्धित सामग्री