Monday, September 01, 2025 08:03:57 AM

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला बनवा साबुदाणा फ्राइज, पटकन होईल तयार

बुधवारी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत उपवासासाठी साबुदाणा फ्राइज कसे बनवतात.

mahashivratri 2025 महाशिवरात्रीला बनवा साबुदाणा फ्राइज पटकन होईल तयार

बुधवारी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. या दिवशी उपवासासाठी अनेक पदार्थ बनवले जातात. उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांनी तुम्ही हे पदार्थ झटपट बनवू शकता. तर आज आपण जाणून घेणार आहोत उपवासासाठी साबुदाणा फ्राइज कसे बनवतात. 

सामग्री:

भिजलेला साबुदाणा, 
उकळलेले आणि कुस्करलेले बटाटे,
भाजलेले शेंगदाणे पावडर,
आले,
भाजलेले जिरा पावडर,
सैंधव मीठ,
ताजी कोथिंबीर,
बारीक कापलेली मिरची,
तळण्यासाठी तेल. 

हेही वाचा: Mahashivratri 2025: या गोष्टींनी करा शिवलिंगावर अभिषेक! जाणून घ्या महत्व

कसे बनवाल फ्राइज:

तळण्यासाठी प्रथम साबुदाणा रात्रभर भिजून ठेवा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा मधून पाणी बाहेर काढा. थोडावेळ साबुदाण्याला गाळणीवर ठेऊन तुम्ही बटाट्यांना उकळीवर ठेवा आणि आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून ठेवा. जेव्हा बटाटे उकळून जाईल तेव्हा त्याला थंड करा आणि कुस्करून ठेवा. मग सैंधव मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे पावडर, बारीक कापलेली हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीरएकत्र करून घ्या. मग हाताला तेल लावा आणि मिक्स केल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे घ्या आणि मग मोठ्या - मोठ्या फ्राइज तयार करा. मग तेल गरम करून घ्या आणि फ्राइजला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. मग फ्राइजला तेलातून बाहेर काढा आणि मग सर्वांना सर्व्ह करा. 

हेही वाचा: त्र्यंबकेश्वरात महाशिवरात्री उत्साहात! नागा साधूंनी केले कुशावर्त तीर्थात स्नान

(टीप- सर्व फ्राइज तयार केल्यानंतर त्याला थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि मग त्याला टाळून घ्या, ज्यामुळे तुमचे फ्राइज सेट होतील आणि तेलात टाकल्यावर फुटणार नाहीत.)


सम्बन्धित सामग्री